चिंताजनक… दिल्लीत कोरोनाचं सावट, महाराष्ट्रात वाढला मृतांचा आकडा!
भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गित रूग्णांचा आकडा 200 च्या पुढे गेला असून संसर्गाचा दर 10 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गित रूग्णांचा आकडा 200 च्या पुढे गेला असून संसर्गाचा दर 10 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आमदारांच्या मतांची बेरीज सुरू असतानाच भाजपची चिंता वाढली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून फडणवीस दौऱ्यावर असून, त्यांनी ट्विट करत याची माहिती दिली. राज्यात राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेनं उमेदवार दिल्यानं निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यात भाजपनं महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर […]
मुंबईत पुन्हा एकदा कोरोना डोकं वार काढताना दिसतोय. तज्ज्ञांनी जुलैमध्ये चौथी लाट येण्याचा इशारा दिला असून, आता महापालिकेनं चौथी लाट रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महापालिकेकडून लसीकरणावर जोर दिला जाणार आहे. कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी विशेषतः १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचं लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी मुंबई महानगरात केंद्र सरकारच्या […]
कोरोनाविरोधी लढ्यात महत्त्वाचं अस्त्र ठरलेल्या कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला. मागील काही महिन्यांपासून किशोरवयीन अर्थात १२ ते १४ वयोगटातील मुलांना कधी लस घेता येणार, अशी चर्चा सुरू होती. अखेर सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. आज हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी […]
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंट पाठोपाठ राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं धडक दिली. मात्र, अवघ्या दीड महिन्यांच्या आतच तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागातील परिस्थितीत सुधारणा होत असून, आज राज्यात 3,502 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मुंबईतही तीनशेच्या आत रुग्ण आढळून आले असून, ओमिक्रॉन रुग्णसंख्येत 218 नवीन रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे […]
– योगेश पांडे, नागपूर महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती जवळपास निवळली असून, दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्यानं निर्बंध हटवले जाणार अशी चर्चा राज्यात सुरू आहे. दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही निर्बंध हटवण्याबद्दल माहिती दिली आहे. महिनाअखेरीस महाराष्ट्र अनलॉक होईल, असं वडेट्टीवार म्हणाले. राज्यातील कोरोना परिस्थिती आणि निर्बंध […]
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच धडकलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरू लागला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख घसरू लागला असून, आज दिवसभरात महाराष्ट्रात 6 हजार 107 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज दिवसभरात 16,035 रुग्ण कोरोनातून बरे होऊ घरी परतले. त्यामुळे सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होऊन लाखाच्या आत आली आहे. […]
कोरोना महामारीविरोधात सुरू असलेल्या भारताच्या लढ्याला आणखी बळ मिळालं आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयकडून एका नव्या लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. या लसीचा एकच डोस घ्यावा लागणार असून, आपतकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. देशात सध्या दोन डोस घ्यावा लागणाऱ्या लसीचा वापर केला जात असून, त्यात आता एक डोजवाल्या लसीची भर […]
कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रातून लवकरच संपणार असल्याचं दिसत आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्याने दररोज बाधित रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज दिवसभरात राज्यात ९,६६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर दिलासादायक बाब म्हणजे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आला नाही. आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली […]
एकीकडे कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याची चिन्हं दिसत असतानाच वाढत्या मृत्यूने चिंता वाढवली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 1,000 पेक्षा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी (1 फेब्रुवारी) 1,192 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या 24 तासांत (2 फेब्रुवारी) 1,700 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर ओसरताना दिसू लागला आहे. दिवसागणिक दररोज […]