आमदार अपात्रतेबाबतच्या हालचालींना वेग, राहुल नार्वेकरांनी दिले मोठे संकेत
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अचानक दिल्ली दौरा केल्यामुळे आमदार अपात्रतेच्या मुद्दा आणखी चर्चेत आला आहे. आमदार अपात्रतेबाबत काय कार्यवाही केली हे सांगण्यासाठी चार दिवस बाकी असतानाच विधानसभा अध्यक्षांनी अनेक विधितज्ज्ञांबरोबर चर्चा केल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.