Ajit Pawar: ‘हा निर्लज्जपणाचा कळस…’, सत्तारांवर अजित पवार संतापले!

वाशिममधील गायरान जमीन वाटप प्रकरण अब्दुल सत्तारांच्या अंगलट आलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने गंभीर शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तारांना सुनावलं. त्याचे पडसाद विधानसभेत आज उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करत अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच या गोष्टीसाठी तुम्हीही तितकेच जबाबदार आहात, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांवर संताप व्यक्त केला. मुंबई उच्च […]

Read More

आरक्षणाचा मुडदा पाडण्याचं काम सरकारने केलं – फडणवीसांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल

महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर रद्द करण्यात आला. यानंतर राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षातील भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे. महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी आजच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण ही आता केंद्राची जबाबदारी असल्याचं म्हटलं. देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांच्या या वक्तव्याचा समचार […]

Read More

नागपूर : देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर पोलिसांचे ४ सशस्त्र जवान तैनात करण्यात आले असून नागपूर पोलिसांनी QRT टीमही फडणवीस यांच्या घराबाहेरील सुरक्षाव्यवस्थेत सहभागी होणार आहे. सध्या देवेंद्र फडणवीस आपल्या परिवारासह मुंबईत आपल्या शासकीय निवासस्थानी राहत असून […]

Read More

मुंबई पोलिसांचं एवढं खच्चीकरण कधीच झालं नव्हतं – आशिष शेलार

API सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करुन त्यांना होमगार्ड विभागात टाकण्यात आलं आहे. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी सचिन वाझे सध्या NIA च्या अटकेत आहेत. याप्रकरणी परमबीर सिंग यांच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. सर्वच स्तरातून राज्य […]

Read More

सचिन वाझेंना अटक, फडणवीस म्हणतात…आता तर सुरुवात झाली आहे!

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्फिओ गाडी प्रकरणी NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आल्यानंतर सत्ताधारी पक्षाने भाजप मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचं म्हटलं. याला […]

Read More

सचिन वाझेंना अटक : फडणवीसांनी शेरलॉक होम्ससारखा तपास केला पण…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुनसुथ हिरेन प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ सुरु आहे. शनिवारी रात्री NIA च्या पथकाने अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधकांनी वाझे यांना अटक व्हावी यासाठी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. या सर्व घडामोडींवर संजय राऊत यांनी सामना मधील ‘रोखठोक’ या आपल्या सदरात […]

Read More

फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर सचिन वाझे म्हणतात…

राज्याच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालचा दिवस हा मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे गाजला. विरोधी पक्षातील भाजपने सचिन वाझे यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सचिन वाझे आणि हिरेन यांची पूर्वीपासून असलेली ओळख आणि या प्रकरणातील त्यांच्यावर असलेला संशय पाहता सचिन वाझेंना तात्काळ निलंबीत करुन त्यांना अटक करावी अशी मागणी फडणवीसांनी केली. हिरेन […]

Read More

गृहमंत्री सचिन वाझेंना हटवायला तयार होते, पण…

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस हा मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळ गाजला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सचिन वाझेंच्या सहभागाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करत, पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणी वाझेंना अटक करण्याची मागणी केली. विरोधी पक्षांनी यानंतर सभागृहात सचिन वाझेंना निलंबीत करण्याची मागणी करत सभागृहात गदारोळ घातला. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात निवेदन […]

Read More

पटेलांची पार्टी आठवली, सचिन वाझेंची पार्टी कोणती आहे?

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात उत्तर दिलं. सभागृहासमोर आपलं निवेदन वाचून दाखवत असताना अनिल देशमुख यांनी खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा दाखला देऊन विरोधी पक्षांना टोला लगावला. प्रशासक म्हणून काम करणारे प्रफुल पटेल हे भाजप सरकारमधले मंत्री होते […]

Read More

हिरेन प्रकरणाशी माझा दुरुनही संबंध नाही – धनंजय गावडे

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सनसनाटी आरोप करत मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली. हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबातील महत्वाचे २-३ मुद्दे वाचून दाखवत फडणवीसांनी वाझे यांनीच हिरेन यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. सभागृहात बोलत असताना फडणवीस यांनी हिरेन यांचं शेवटचं लोकेशन ज्या […]

Read More