पांडवकालीन शिवमंदिराच्या आवारातील तलावात हजारो माशांचा अचानक मृत्यू
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली ठाणे रायगड जिल्ह्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या खिडकाळी गावच्या प्राचीन खिडकाळेश्वर मंदिराच्या आवारात मासे मेल्याची बातमी पसरताच मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी गर्दी केली होती. ठाणे महापालिकेने आपल्या हद्दीत असलेल्या तलावाची काळजी घेतली असती तर हा मोठा अनर्थ टळला असता. मृत माश्यांचा खच पडला असल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तलाव परिसरात भेट दिली आहे. […]