मुंबईतील खार येथील इमारतीला आग, एका महिलेचा मृत्यू, दोन महिलांना सुखरुप बाहेर काढलं

मुंबईतील खार भागात निवासी इमारतीमधील एका खोलीत लागलेल्या आगीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. ज्या खोलीत आग लागली तिकडे तीन महिला अडकल्या होत्या, त्यापैकी दोन महिलांना सुखरुप वाचवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुतन व्हिला या सोसायटीच्या विजेच्या मिटरबॉक्समध्ये सर्वात पहिल्यांदा आग लागली. यानंतर […]

Read More

पुणे-सातारा मार्गावर ट्रॅव्हल्स बस अचानक आग; सुदैवाने जीवित हानी टळली

पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावच्या हद्दीत ट्रॅव्हल्स मिनी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही घटना सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पुणे-सातारा मार्गावरून सातार्‍याच्या दिशेने जाणाऱ्या मिनी बस कात्रज बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर बसचा इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन इंजिनने अचानक पेट घेतला. त्यावेळी बसमध्ये […]

Read More

Pirangut chemical fire : अजितदादांनी दिले चौकशीचे आदेश, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

पुण्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. मात्र काही लोकांना वाचवता आलं नाही हे दुःखदायक आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणी त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर […]

Read More

Pune : पिरंगुटमध्ये कंपनीला भीषण आग, 18 जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील मुळशीमधल्या उरवडे मधे पिरंगुट औद्योगिक परिसरातील अक्का टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या कंपनीत तेव्हा 37 कामगार होते. त्यातले 17 जण अडकले होते.आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. या घटनेत आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आगीचे नेमके कारण समजू […]

Read More

गुजरातमध्ये Covid रूग्णालयाला आग, 16 जणांचा मृत्यू

गुजरातच्या भरूचमध्ये कोव्हिड रूग्णालयाला आग लागून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली अशी माहिती भरूचचे जिल्हाधिकारी डॉ. मोध्या यांनी दिली. 16 कोरोना रूग्णांना या घटनेत त्यांचे प्राण गमावावे लागले आहेत. या ठिकाणी एकूण 70 रूग्णांवर उपचार सुरू होते. हे चारमजली रूग्णालय आहे, या ठिकाणी 70 रूग्णांवर उपचार सुरू होते. […]

Read More

मलकापुरातील लोटस फर्निचरच्या शोरूमला भीषण आग

कराड जवळच्या मलकापुर शहरातील एका फर्निचर शोरूमला आग लागली. आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती आहे. पुणे बंगळूर आशियाई महामार्गला लागून असलेल्या लोटस शोरूमला ही आग लागली. मुख्य म्हणजे यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. काही वेळातच या शोरूममधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. काही वेळातच धूराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसू लागल्यानंतर […]

Read More

Mumbra Fire: मुंब्रा येथील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलला आग, 4 रुग्णांचा मृत्यू

ठाणे: कोरोना संकटाच्या काळात हॉस्पिटलला आग लावून रुग्णांचे हकनाक बळी जाण्याच्या घटना काही थांबलेल्या नाहीत. विरार आगीची घटना ताजी असतानाच आज (28 एप्रिल) पहाटे मुंब्र्यातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयाला पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ज्यामध्ये आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं समजतं आहे. दरम्यान, मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भीती सध्या व्यक्त केली जात […]

Read More

Mumbra Fire: मुंब्रामधील हॉस्पिटलला भीषण आग, मृतांची यादी जाहीर

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मुंब्रा येथील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलला आज (28 एप्रिल) पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळजवळ 4 रुग्णांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. आता या चारही मृत रुग्णांच्या नावाची यादी स्थानिक प्रशासनाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. या भीषण आगीमध्ये रुग्णालयातील 2 पुरुष आणि 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. […]

Read More

Virar Fire : ‘मुख्यमंत्री दरवेळी आश्वासन देतात फायर आॅडिट होईल पण.. ‘

विरारमधलं अग्नितांडव आणि त्यामध्ये गेलेला 13 जणांचा जीव ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोव्हिड काळात रूग्णालयांवर प्रचंड ताण आहे. भंडारा, नाशिक आणि विरारमध्ये घडलेल्या घटना या अत्यंत भयंकर आहेत. विरारच्या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या सहवेदना आहेत, प्रत्येक घटनेनंतर मुख्यमंत्री चौकशी करू, फायर ऑडिट करू असं सांगतात. पण प्रत्यक्षात काहीही होत नाही हेच […]

Read More

Virar Fire: आगीतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान, मुख्यमंत्र्याकडून आर्थिक मदत जाहीर

मुंबई: विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत तब्बल 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत घोषित केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO)आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जाहीर केलं आहे की, ‘विजय वल्लभ रूग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या वारसांना […]

Read More