पुण्यात गँगवार भडकणार? गजा मारणे प्रकरणात पोलिसांचा ‘तो’ रिपोर्ट का चर्चेत?
gaja marne latest news : गजानन मारणेला न्यायालयात जामीन मिळाला, पण पोलिसांच्या एका रिपोर्टची चर्चा सुरू आहे आणि काही प्रश्न उपस्थित झालेत.
gaja marne latest news : गजानन मारणेला न्यायालयात जामीन मिळाला, पण पोलिसांच्या एका रिपोर्टची चर्चा सुरू आहे आणि काही प्रश्न उपस्थित झालेत.
पुणे : शहरातील शेअर दलाल आणि व्यावसायिकाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्याच्या आरोपात कुख्यात गुंड गज्या उर्फ गजानन मारणे याच्यासह १४ जणांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी याबाबत आदेश दिले. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या तपासात या टोळीने परिसरात आपले वर्चस्व निर्माण व्हावे आणि अवैध […]
गुंड गजा मारणेच्या नावाची भीती घालून अवैधरित्या सावकारी करणाऱ्या एका इसमाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण थोरात असं या सावकाराचं नाव असून, थोरातने आपल्या पैशांची वसुली करण्यासाठी तक्रारदार मोहन किनगेची आर्थिक पिळवणूक सुरु केली होती. दारु अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला २०१९ मध्ये प्रवीण थोरात याने दहा टक्क्याच्या व्याजाने किनगे यांना ४० हजार […]
तळोजा जेलमधून बाहेर पडल्यानंतर पुण्यापर्यंत आपल्या समर्थकांसह भव्य मिरवणूक काढल्यामुळे चर्चेत आलेला पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा फास आवळला आहे. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातून गजा मारणेला अटक करण्यात आली. आपल्यावरील सर्व गुन्हे रद्द व्हावे यासाठी गजा मारणेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतू २४ मार्चला झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने […]
पुणे पोलिसांना गुंगारा देऊन साताऱ्यातील जावळी भागात मेढा येथे लपलेल्या गजा मारणेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील मेढा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रात्री कारवाई करत गजा मारणे व त्याच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली. या कारवाईत मोलाची भूमिका बजावणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांना गजा मारणेने कडक सॅल्युटही मारला. मारणे व त्याच्या […]
तुरुंगातून सुटल्यानंतर तळोजा जेल ते पुण्यापर्यंत ५०० गाड्यांच्या ताफ्यातून जंगी मिरवणूक काढणाऱ्या गजा मारणेला पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. पुणे पोलिसांनी गुंगारा देऊन गजा मारणे साताऱ्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पोलीसांचं पथक त्याच्या मागावर होतं. अखेरीस मध्यरात्री साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारणेला पोलिसांनी अटक केली आहे. साताऱ्यात दाखल झाल्यानंतर गजा मारणे सुरुवातीला महाबळेश्वर […]
पुणे: कारागृहातून सुटल्यानंतर रॅली काढणे कुख्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या इतर साथीदारांना दिवसेंदिवस महागात पडत चालले आहे. यापूर्वी तळेगाव आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात दहशत माजवल्याचा गुन्हा गज्या मारणे टोळी विरोधात दाखल असतानाच आता दरोड्याचा नवा गुन्हा तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढल्यामुळे चर्चेत आलेला पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात कारवाईचा पोलीसांनी फास आवळायला सुरुवात केली आहे. खूनाच्या आरोपातून जेलमधून सुटल्यानंतर गजा मारणेच्या समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासन जागं झालं असून मारणे समर्थकांविरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून गजा मारणे व […]
खुन खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणेची त्याच्या समर्थकांनी तळोजा जेल ते पुण्यापर्यंत अशी वाजत-गाजत मिरवणूक काढली. ५०० गाड्यांच्या ताफ्यासह तळोजावरुन निघालेला गजा मारणेच्या समर्थकांचा ताफा प्रत्येक टप्प्यावर नियम मोडत होता. पुण्यात दाखल झाल्यानंतर कोथरुड पोलिसांनी कोरोना काळाज जमावबंदीचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल करत गजा मारणेला पुन्हा अटक केली. परंतू या प्रसंगाने पुण्यातील […]
खुन खटल्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा जेलमधून पुण्याकडे जात असताना काढलेल्या जंगी मिरवणूकीमुळे चर्चेत आलेला प्रख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये गजा मारणे आणि त्याच्या काही साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे आणि नजिकच्या परिसरात मारणे टोळीची चांगलीच दहशत आहे. या टोळीचा गुंड गजा मारणेला काही महिन्यांपूर्वी […]