मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात
देशात 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आलेली असतानाच महानगर गॅस कंपनीकडून मात्र सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. हा निर्णय मुंबईसह उपनगरासाठी घेण्यात आला असून त्यामुळे मुंबईकरांचा फायदा होणार आहे.