‘निवृत्ती घेण्यासाठी ही योग्य वेळ’, IPL 2023 जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची मोठी घोषणा
Mahendra Singh Dhoni On Retirement :निवृत्ती घेण्याची हीच सर्वांत उत्तम वेळ आहे. माझ्यासाठी खुप सोप्प आहे की धन्यवाद बोलून निवृत्ती घ्यावी. पण नऊ महिने आणखीण कसून मेहनत करून आणखीण एक आयपीएल सीजन खेळण्याच्या प्रयत्न करेन. फक्त शरीर साथ द्यायला हवे, असे विधान करून धोनीने आणखीण आयपीएल सीझन खेळण्याचे संकेत दिले आहेत.