Rain Update : राज्यात तीन दिवस पाऊस, पण मराठवाडा कोरडाच

येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होणार आहे तर मराठवाड्यात पाऊस होणार नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्याचा थेट परिणाम मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर होऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न घटणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Read More

Monsoon 2023: कल्याण-डोंबिवलीत तुफान पाऊस, पोलीस स्टेशनही गेलं पाण्याखाली

Mumbai Rain 2023: कल्याण आणि डोंबिवलीमध्ये मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस बरसत असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे महापालिकेचे नालेसफाईचे दावे देखील फोल ठरले आहेत.

Read More

Rain Alert : पूर्व किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रालाही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

मान्सून माघारी परतल्यानंतर देशातील काही राज्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत पावसाने कहर केला असून, पुन्हा एकदा 21 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला असून, नोव्हेंबर अखेरीस (29 व 30 नोव्हेंबर) काही जिल्ह्यांत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला […]

Read More

केरळात विध्वंस! पावसाने हाहाकार; 21 जणांचा मृत्यू, मदतकार्याला वेग

महाराष्ट्रापाठोपाठ पावसाने केरळाला तडाखा दिला असून, राज्यातील अनेक भागात प्रचंड नुकसान झालं आहे. केरळातील काही जिल्ह्यांत भूस्खलन आणि महापुरांमुळे हाहाकार उडाला असून, आतापर्यंत यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळात पावसाचं तांडव सुरु असून, मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील जनजीवन ठप्प झालं आहे. पावसामुळे परिस्थिती पूर्णपणे कोलमडली असून, आतापर्यंत भूस्खलन आणि इतर घटनांमध्ये तब्बल 21 […]

Read More

पंढरपुरातला जुना दगडी पूल पाण्याखाली, नीरा नदी दुथडी भरुन वाहू लागली

नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असल्याने उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे . त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच संभाव्य पूर परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. दरम्यान […]

Read More

उस्मानाबादला पावसाने झोडपलं; शेतकरी म्हणतो,’पवारसाहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही’

– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनीधी मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपलं आहे. गेल्या १५ दिवसांत उस्मानाबादमध्ये दुसऱ्यांदा ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. खेड, तेर, ढोकी या परिसरात सलग तीन तास पावसाची संततधार कायम होती, ज्यामुळे सोयाबीनसह तूर, उस अशा पिकांचं नुकसान झालं आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल […]

Read More

Kokan Flood : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा

कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पावसाचाही हाहाकार पाहण्यास मिळतो आहे. चिपळूण, रायगड, महाड या ठिकाणची स्थिती चिंताजनक आहे. रायगड जिल्ह्यातलं तळये गाव हे तर भूस्खलन झाल्याने वाहून गेलं आहे. या ठिकाणी अद्यापपर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. निसर्गाचा कहर अशा प्रकारे बघायला मिळतो आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी […]

Read More

Mahad Flood: महाड पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. बचावकार्य व रस्त्यावरील अडथळे […]

Read More

Mumbai Rain : मुंबईला रेड अलर्ट! पालघर, ठाणे, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईमध्ये पावसाने शनिवारी त्याचं रौद्ररूप काय असतं ते दाखवून दिलं. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाणीच पाणी साठल्याचं पाहण्यास मिळालं. आता मुंबईसह चार जिल्ह्यांना अतिमुसळधार इशारा देण्यात आला आहे. पुन्हा एकदा मुंबईत पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. […]

Read More