ICC ची मोठी कारवाई, भारत-पाकिस्तान संघाला फटका, टीम इंडियाला का बसला सर्वाधिक दंड?

आशिया चषक 2022 मध्ये, 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. तेव्हा चाहत्यांनी या सामन्याची चांगलीच मजा लुटली. कारण हा सामना अतिशय रोमहर्षक झाला, सामन्याचा निकाल शेवटच्या षटकापर्यंत लागलेला नव्हता. मात्र या रोमांचक सामन्यात दोन्ही संघांना दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने भारत आणि पाकिस्तान संघाला 40 टक्के दंड ठोठावला आहे, हा दंड […]

Read More

मंकडींग ते चेंडूला लाळ लावण्यास बंदी : क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल, जाणून घ्या…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये नियम ठरवण्याची जबाबदारी मॅरिलेबॉन क्रिकेट क्लब अर्थातच MCC या संस्थेकडे असते. नुकत्याच झालेल्या बैठकीत MCC ने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल केले असून येत्या १ ऑक्टोबरपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. नवीन नियमांमध्ये आता खेळाडूंना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. याआधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने बॉलर्स आणि फिल्डर्सना […]

Read More

हिटमॅनच्या नेतृत्वात टीम इंडिया चमकली, ६ वर्षांनी टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर मात करत वन-डे पाठोपाठ टी-२० मालिकाही ३-० च्या फरकाने जिंकली. या कामगिरीच्या जोरावर टीम इंडिया आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर आली आहे. तब्बल ६ वर्षांनी भारतीय संघाला टी-२० क्रमवारीत पहिलं स्थान मिळवण्याची संधी मिळाली आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आला होता. […]

Read More

भारतीय उद्योगपतीकडून मॅच फिक्सींगसाठी दबाव, झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा धक्कादायक खुलासा

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन टेलरने धक्कादायक खुलासा केला आहे. स्पॉट फिक्सींगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतामधील काही सट्टेबाजांनी आपल्याशी संपर्क केल्याचं टेलरने मान्य केलं आहे. टेलरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. ऑक्टोबर २०१९ च्या अखेरीस आपल्याला भारतातील एका उद्योगपतीने संपर्क साधून झिम्बाब्वेत एका टी-२० स्पर्धेच्या आयोजनाबद्दल चर्चा करण्यासाठी […]

Read More

Ind vs SA : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

टीम इंडियाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात नियोजीत वेळापत्रकानुसार टीम इंडिया ३ कसोटी, ३ वन-डे आणि ४ टी-२० सामने खेळणार होती. परंतू ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आता टी-२० मालिका पुढे ढकलण्यात आली असून दोन्ही संघ फक्त कसोटी आणि वन-डे सामने खेळतील. २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या […]

Read More

T-20 World Cup मध्ये यंदा पहिल्यांदाच DRS चा वापर, ICC चा महत्वपूर्ण निर्णय

ओमान आणि युएईत होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकात यंदा पहिल्यांदाच DRS (Decision Review System) प्रणालीचा वापर होणार आहे. आयसीसीने याबद्दलची घोषणा केली असून १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. सर्व संघांना या स्पर्धेत प्रत्येक इनिंगमध्ये दोन DRS च्या संधी मिळणार आहेत. कोविड-१९ मुळे यंदा टी-२० विश्वचषकात एलिट पॅनल अंपायर्ससोबतच काही कमी […]

Read More

T-20 World Cup : भारताला हरवण्यासाठी पाक संघाला खास ऑफर, सामना जिंका ब्लँक चेक देतो…!

१७ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी २४ तारखेला समोरासमोर येणार आहेत. सध्याच्या घडीला हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्येच खेळतात. परंतू टी-२० विश्वचषकाच्या सामन्याआधीच पाकिस्तानमध्ये भारताला हरवण्याठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. पाकिस्तानच्या संघाने आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला हरवलं तर एक गुंतवणूकदार पाक क्रिकेट बोर्डाला ब्लँक […]

Read More

भारताने ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट क्षणार्धात कोसळेल – PCB प्रमुख रमीझ राजांनी व्यक्त केली भीती

दहशतवादाच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यातले क्रिकेट सामने सध्या बंद आहेत. आयसीसीच्या स्पर्धा वगळता दोन्ही संघ सध्या सामने खेळत नाहीत. आगामी टी-२० विश्वचषकात हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर येतील. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलंय. आयसीसीला मिळणारं ९० टक्के उत्पन्न हे भारताकडून येतं, त्यामुळे उद्या जर भारताने […]

Read More

T-20 World Cup : ७० टक्के प्रेक्षकांना युएईत सामना पाहण्याची परवानगी

युएईमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकात सामने पाहण्यासाठी स्टेडीअममध्ये ७० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा चौदावा हंगाम आणि टी-२० विश्वचषक युएईत हलवला आहे. ओमानमध्ये टी-२० विश्वचषकाची प्राथमिक फेरी पार पडणार आहे. परंतू या ठिकाणी वादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहून नंतर प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रविवारी शाहीन हे चक्रीवादळ ओमानच्या […]

Read More

PCB ला आणखी एक धक्का, न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडच्या संघाचाही पाकिस्तानात येण्यास नकार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणखी एक धक्का बसलेला आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडच्या संघाने सुरक्षेचं कारण देऊन पाकिस्तान दौरा रद्द केला होता. सामना सुरु होण्याआधी अर्धा तास बाकी असताना हा दौरा रद्द झाल्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान झालं. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही आपला नियोजीत पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. इंग्लंडचा क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात […]

Read More