Samudrayaan : चंद्र-सूर्यानंतर आता समुद्र.. कोणालाही जमलं नाही ते आता भारत करणार?
चांद्रयान-3 चंद्रावर उतरवल्यानंतर आणि सूर्याचे रहस्य शोधण्यासाठी आदित्य एल-1 पाठवल्यानंतर आता भारतीय शास्त्रज्ञांनी महासागराची खोली मोजण्याची तयारी केली आहे. भारत आपली पहिली मानवयुक्त सागरी मोहीम पाठवण्याच्या तयारीत आहे, ज्याला समुद्रयान असे नाव देण्यात आले आहे.