Dombivali : घरं धोक्यात, कुटुंब उघड्यावर;शिळफाटा रोडवर रहिवाशांचा आक्रोश

डोंबिवलीतील शांती उपवन कॉम्प्लेक्समध्ये एका इमारतीला भला मोठा तडा गेल्याची घटना शनिवारी (4 मार्च) रात्री घडली. डोंबिवली परिसरात पाच इमारती असलेल्या या कॉम्प्लेक्समधून सर्वांना रात्रीच बाहेर काढावं लागलं. 240 कुटुंब या इमारतीत राहतात. त्यांना शाळा आणि मंदिरात ठेवण्यात आलं, पण सोयी-सुविधा नसल्यानं ते संतप्त झाले. रविवारी (5 मार्च) शांती उपवन इमारतीतील रहिवाशांच्या संयमाचा कडेलोट झाला. […]

Read More

अंबरनाथ गोळीबारामागे राजकारण काय? फडके-पाटलांमध्ये का वाजलं?

गळ्यात किलोभर सोनं, कमरेला लटकवलेले पिस्तुल, पायात पांढरी कोल्हापुरी, महागड्या गाड्या, किरकोळ शरीरयष्टी आणि बैलगाडा. नवी मुंबईच्या, कल्याण डोंबिवलीच्या पट्ट्यात बैलगाडा शर्यत म्हटलं की पंढरीशेठ फडके यांचं नाव येतंच! अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून १३ नोव्हेंबरला पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बैलगाडा […]

Read More

कल्याण-डोंबिवलीची अवस्था दयनीय : अनुराग ठाकूरांनी आयुक्तांना सर्वांसमोर सुनावले…

कल्याण : कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी आहे हे ऐकूनच मी हैराण झालो. कारण आतापर्यंत ज्या शहराला स्मार्ट सिटी घोषित केले, तिथे बदल आणि काम झालेले मी पाहिले आहे. मात्र कल्याण – डोंबिवली हे शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित केल्याचे मला वाटलेच नाही, असे खडेबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना सर्वांसमोर […]

Read More

आगामी लोकसभेसाठी अनुराग ठाकूर अन् श्रीकांत शिंदेंमध्ये दावे-प्रतिदावे : सामना रंगणार?

कल्याण : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने मायक्रो प्लॅनिंग केलं आहे. राज्यातील निवडक १६ मतदार संघात थेट केंद्रातून नेते पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना (दोन्ही गट) आणि दोन्ही पक्षांचे मतदारसंघ लक्ष करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर सध्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत. या मतदार संघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे […]

Read More

आदित्य ठाकरेंचा भाजपला धक्का, कल्याण-डोंबिवलीतले चार माजी नगरसेवक शिवसेनेत

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजपचे चार माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रवी मट्या पाटील हे शिवसेना पक्षात प्रवेश केले आहेत. गेल्या दोन महिन्यांत भाजपाच्या 6 विद्यमान आणि 2 माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपसह […]

Read More

कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी लवकरच निवडणुका, प्रभाग रचना जाहीर

मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आता लवकरच होणार आहे. कारण या सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे इ.चा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सविस्तर माहिती आज (1 फेब्रुवारी) एका पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केली आहे. मागील […]

Read More

कल्याण : ती आत्महत्या नव्हे हत्या! मुलगा आणि वडील 8 दिवसांपासून घरातच पित होते दारू

कल्याणच्या चिकणघर दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मुलगा आणि पत्नीला मारहाण करत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेनं वेगळंच वळण घेतलं नाही. त्या व्यक्तीने आत्महत्या केली नाही, तर मुलानेच वडिलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. मुलानेच पिताची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. इतकंच नाही, तर भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या आईलाही त्यानेच चाकूने […]

Read More

कल्याण : पत्नी व मुलावर हल्ला, स्वतःला संपवलं; घरातील दृश्य पाहून सोसायटीचे सदस्यही हादरले

कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना घडत असून, कल्याण पश्चिममध्ये विचित्र घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाला हल्ला करून जखमी केलं आणि नंतर स्वतःला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. मयत व्यक्तीच्या जखमी झालेल्या मुलाने पोलिसांना ही माहिती दिली. मयत व्यक्ती सेवानिवृत्त मोटरमन असून, प्रमोद बनोरिया मयताचं नाव आहे. मुलाचं नाव लोकेश […]

Read More

परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या 12 जणांचा अजूनही ठिकाणा सापडेना; काहीजणांची घरं बंद

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सतर्कता बाळगली जात असून, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महानगरांसह इतर जिल्ह्यांतही सावधगिरी बाळगली जात आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 318 जण परदेशातून आले असून, त्यापैकी 12 जणांचा अजूनही ठिकाणा सापडत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या 318 नागरिकांपैकी 306 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. तर इतर […]

Read More

कल्याण हादरलं! सार्वजनिक शौचालयात रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र आहे. कल्याणामध्येही गुन्हेगारीच्या घटनांवर चिंता व्यक्त होत असतानाच आता आणखी एक खळबळजनक हत्येची घटना उजेडात आली आहे. सार्वजनिक शौचालयात एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. रिक्षाचालकाची सार्वजनिक शौचालयात अज्ञात व्यक्तींकडून त्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना […]

Read More