महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार पण नियम कोणते बदलणार?

मुंबई तक: राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत गुरुवारी महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलाय. मात्र,या लॉकडाऊनचे नियम बदलतील का प्रश्न निर्माण झाला आहे. टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल होणार.

Read More

शिवभोजन थाळी 14 जून 2021 पर्यंत मोफत!, म्हणजे लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ?

मुंबई: मुख्यमंत्री कार्यालयाने थोड्याच वेळापूर्वीच एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलं आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, 14 जून 2021 पर्यंत महाराष्ट्रात शिवभोजन थाळी ही मोफत मिळणार आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्याची साखळी तोडण्यासाठी साधारण एप्रिल महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अशावेळी गरीबांचे हाल होऊ नये यासाठी ठाकरे सरकारने मोफत शिवभोजन […]

Read More

नाव न घेता उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना चिमटा, म्हणाले…

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लॉकडाउनमुळे राज्यातली रुग्णसंख्या स्थिरावली असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकल्यानंतर शेवटी मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. Break The Chain चे निर्बंध लादल्याने कोरोना महाराष्ट्रात […]

Read More

लॉकडाउनमुळे काम बंद, पैश्यांसाठी हॉटेलचे कुक बनले मोबाईल चोर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे. या लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्या अनेक जणांवर पुन्हा एकदा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. लॉकडाउमुळे केरळमधील हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या तिघा मित्रांचं काम बंद झालं. पैशांची चणचण दूर करण्यासाठी त्यांनी मोबाईल चोरून मुंबईत विकण्याचा प्लान आखला…परंतू रेल्वे पोलिसांच्या शिताफानीने तिन्ही आरोपींना अटक […]

Read More

महाराष्ट्रात दिवसभरात 66 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्ण, 771 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 66 हजार 159 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर दिवसभरात 771 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.5 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 68 हजार 537 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 37 लाख 99 हजार 266 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात […]

Read More

महाराष्ट्रात 15 मे पर्यंत वाढला Lockdown, ठाकरे सरकारचे आदेश

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याआधी 14 एप्रिल ते 1 मे या कालावधीत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. आता तो 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. ठाकरे सरकारने यासंदर्भातलं एक परिपत्रक काढून माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये त्यामुळे लॉकडाऊन किमान दोन आठवड्यांनी वाढवण्यात […]

Read More

कोरोना लस, Oxygen उपकरणांवरील Custom Duty तीन महिन्यांसाठी माफ

गेल्या काही दिवसांपासून देशातील महत्वाच्या राज्यांत वाढत असलेले कोरोना रुग्ण आणि रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिन्यांसाठी कोरोना लस, ऑक्सिजन व इतर वैद्यकीय उपकरणांवरील कस्टम ड्युटी माफ केली आहे. देशभरात १ मे पासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. मुंबईत 12 रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या […]

Read More

सरकारने मनावर दगड ठेवून Lockdown केला आहे, लोकांना कळकळीची विनंती आहे की…

महाराष्ट्र सरकारने मनावर दगड ठेवून आत्ताचा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. मी सगळ्या जनतेला कळकळीची विनंती करतो आहे की हा लॉकडाऊ यशस्वी करून दाखवा नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होत जाईल असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुंबई तकशी संवाद साधत असताना राजेश टोपे यांनी हे आवाहन केलं आहे. माणसाचा जीव वाचवणं हे […]

Read More

संपूर्ण लॉकडाउनला फडणवीसांचा विरोध, सर्वपक्षीय बैठकीत मांडले महत्वाचे १२ मुद्दे, जाणून घ्या…

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता आता लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचंही उद्धव ठाकरेंन बोलून दाखवलं. आता लॉकडाउन न लावल्यास पुढे परिस्थिती गंभीर होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. परंतू विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाउनला आपला विरोध असल्याचं सांगत राज्य सरकारला काही महत्वाच्या सूचना केल्या […]

Read More

Lockdown : आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही – उद्धव ठाकरे

राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लावलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आता लॉकडाउनशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. आता लॉकडाउन लावलं नाही तर येणाऱ्या १५-२० दिवसांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होईल असे सूचक संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. …तर लॉकडाउन करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं – खासदार […]

Read More