तुझ्यात जीव रंगला फेम राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेतून येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या मातीत कसून तयार झालेला रांगडा मर्द हार्दिक जोशी म्हणजेच झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतील राणादा आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहे. अभिनेता हार्दीक जोशी याच्या राणादा या व्यक्तिरेखेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि राणामुळे हार्दिकला ओळख मिळाली. मालिका संपल्यावर या राणाला प्रेक्षक खूप मिस करत आहेत. पण आता हा राणा म्हणजेच अभिनेता […]

Read More

सुप्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडे करणार ‘मी होणार सुपरस्टार…जल्लोष डान्सचा’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन

स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार…जल्लोष डान्सचा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करणार आहे अभिनेत्री संस्कृती बालगुडे. तब्बल ८ वर्षांनंतर संस्कृती धमाकेदार टेलिव्हिजन कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. विशेष बाब म्हणजे संस्कृती पहिल्यांदाच होस्टच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संस्कृतीला वेगवेगळ्या रुपात याआधी प्रेक्षकांनी पाहिलं आहे. पण मी होणार सुपरस्टार मधला तिचा ग्लॅमरस अंदाज अनोखा […]

Read More

लवकरच येतेय अनोखी प्रेमकथा ‘मन झालं बाजिंद’

आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे.मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, […]

Read More

श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. हो हे खरं आहे. छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता झी मराठीवरील आगामी मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून श्रेयस तळपदे पुन्हा […]

Read More

मोहितने घडवून आणला चिन्याचा अपघात, हे कळल्यावर काय करणार मालविका?

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला हि लोकप्रिय मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. स्वीटू आणि ओमच्या प्रेमाची नलू परीक्षा घेतेय. अनेक अडचणींवर मत करून ओम या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी धडपड करतोय. त्यातच स्वीटू आणि ओम मध्ये गैरसमज देखील निर्माण होत आहेत पण त्यामागे मोहित आणि मालविका यांचा हात आहे.मालविकाच्या सांगण्यावरून मोहित ओमच्या […]

Read More

स्टार प्रवाहवरील तुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकर यांची होणार धडाकेबाज एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. लवकरच मालिकेत इन्सपेक्टर गौतम साळवी यांच्या रुपात सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर यांची एण्ट्री होणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर ते मालिका विश्वात पदार्पण करणार आहेत.तुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना संजय नार्वेकर म्हणाले, ‘नाटक आणि सिनेमामध्ये प्रेक्षकांनी मला पाहिलं आहे. मालिकेसाठी बराच वेळ द्यावा लागतो. […]

Read More

खलनायक साकारण्याची ही पहिलीच वेळ – अतुल परचुरे

सध्या टेलिव्हिजनवरील खलनायकांमध्ये प्रेक्षकांच्या मनात माझा होशील ना या मालिकेतील ‘जेडी’ या खलनायकाने घर केलं आहे. खरोखर प्रेक्षकांना जेडीचा राग येईल इतकी चोख भूमिका अभिनेता अतुल परचुरे हे निभावत आहेत. या भूमिकेसाठी त्यांना प्रेक्षक चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत.या भूमिकेबद्दल बोलताना अतुल परचुरे म्हणाले, “कधी कधी आपण फार विचार न करता एखाद्या भूमिकेला हो म्हणतो […]

Read More

अभिमन्यू – लतिकाच्या नात्यात येणार कायमचा दुरावा ?

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याचे सत्य जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबसमोर आले. आणि हे सत्य लपवल्यामुळे अभि आणि लतिकाचे नातं पणाला लागलं. प्रेमामध्ये प्रत्येकालाच परीक्षा द्यावी लागते आणि असेच काहीसे अभि – लतिकाबद्दल झाले आहे. दोन कुटुंबात वाढत असलेल्या दुरावा आणि कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत […]

Read More

संजीवनी वाढदिवसानिमित्त देणार रणजीतला खास सरप्राईझ! काय असेल दादासाहेबांची खेळी ?

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये बर्‍याच घटना बघायला मिळत आहेत. प्रेक्षक खूप महिन्यांपासून वाट बघत होते की, संजीवनीला कधी पोलिस वर्दीमध्ये बघता येईल. आणि अखेर संजु PSI बनली. PSI संजीवनीला प्रेक्षकांची पसंती देखील मिळत आहे. संजीवनीच्या आयुष्यातील संकट मात्र अजूनही कमी झालेली नाही. संजु PSI झाल्यापासून तिची जबाबदारी अधिकच वाढली आहे. पण संजीवनी घराची आणि […]

Read More

बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे ८०० भाग पूर्ण

गेलं दोन वर्ष महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही आपली लाडकी मालिका पूर्ण करतेय ८०० भागांचा यशस्वी टप्पा. संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते आहे. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान बनलं आहे. अवघा महाराष्ट्र […]

Read More