भास्कर जाधव रडारवर? नवी मुंबईत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

शिवसेनेतल्या फुटीपासून शिंदे गट आणि भाजपविरुद्ध आक्रमक झालेल्या ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबईतल्या एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील शिवसैनिक ए.के. मढवी यांना पोलिसांकडून तडीपार करण्यात आलं आहे. तर खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेत […]

Read More

नवी मुंबईच्या क्राईम ब्रँचने केला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; 362 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

मुंबई: महाराष्ट्रात ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. नवी मुंबईतील गुन्हे शाखेच्या पथकाने या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने कोट्यवधींचे हेरॉईन जप्त केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात (International Drug Racket) या हेरॉईनची किंमत 362.5 कोटी इतकी आहे. कालच नवी मुंबई पोलिसांना अमली पदार्थांची पकडण्यात यश आले होते. […]

Read More

शिवसेनेला नवी मुंबईत झटका! शिवसेनेतील राज्यमंत्री दर्जा असलेले बडे नेतेच शिंदेंच्या गटात

आमदारांच्या बंडखोरींनतर एकनाथ शिंदेंचं प्रस्थ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील माजी नगरसेवकही उद्धव ठाकरेंची साथ सोडताना दिसत आहे. ठाणे महापालिकेच्या ६६ माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला झटका बसला आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्यांमध्ये राज्यमंत्री दर्जाचं पद असणाऱ्यांचाही समावेश आहे. सुमारे ५० आमदारांना घेवून वेगळा गट बनवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. […]

Read More

वाशीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, हार्बर लाईनवर लोकल सेवा विस्कळीत

नवी मुंबईतल्या वाशी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. याचा फटका साहजिकच कामावर जाणाऱ्या नवी मुंबईकरांना बसला आहे. अनेक प्रवाशांना लोकल सेवा का विस्कळीत झाली आहे हे देखील समजलं नव्हतं. पनवेल मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठणाऱ्यांसाठी पिक अवर जिकिरीचे ठरत आहेत. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज […]

Read More

गणेश नाईकांवर महिलेनं आरोप केलेलं लिव्ह इनचं ‘ते’ प्रकरण काय?

नवी मुंबई: भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने नवी मुंबईच्या नेरुळ पोलिसात तक्रार दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने गणेश नाईकांवर असा आरोप केला आहे की, गेले अनेक वर्ष ते लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते. आणि त्यांना 15 वर्षाचा एक मुलगा देखील आहे. आपल्या मुलाला नाईकांच्या संपत्तीत अधिकार आणि त्यांचं नाव मिळावं अशी महिलेची मागणी आहे. […]

Read More

शिवसेनेच्या माजी नगरसेविकेकडून शिवसेना विभाग प्रमुखालाच मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

निलेश पाटील, नवी मुंबई: शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या नवी मुंबईत बरीच चर्चा सुरु आहे. दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेजच्या लोकार्पण सोहळ्याला भाजपाच्या व्यासपीठावरील उपस्थिती आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार स्वीकारतानाचे व्हीडिओ बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी वरिष्ठांना […]

Read More

अनैतिक संबंधामुळे महिलेने गमावला जीव, लॉजवर बोलवून प्रियकराने केली हत्या

निलेश पाटील, नवी मुंबई: नवी मुंबईतील तुर्भे येथील एका लॉजमध्ये महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. प्रियकराने महिलेची हत्या केल्याची प्राथमिक माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक देखील केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भेतील साई प्रणव लॉजवर एक जोडपं 23 फेब्रुवारीला आलं होतं. पण […]

Read More

टिटवाळ्याच्या तरुणाने वाशीच्या खाडीत घेतली उडी; टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण आलं समोर

वाशी खाडी पुलावर आत्महत्येच्या घटना वारंवार घडत असून, आज एका तरुणानं पुलावरून उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी वेळीच प्रयत्न केल्याने तरुणाला नवं आयुष्य मिळालं. २३ वर्षीय तरुणाने वाशी खाडीच्या पुलावर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुख्तार खान असं या तरुणाचं नाव आहे. पुलावरून कुणीतरी खाली उडी मारल्याचं लक्षात आल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले. […]

Read More

नवी मुंबईत सोसायटीच्या निवडणुकीत राडा; दोन गटांच्या वादात रहिवाशांना मारहाण

–नीलेश पाटील, नवी मुंबई राजकारण आणि निवडणुकांची झिंग आता अगदी छोट्या मोठ्या निवडणुकीतही उतरताना दिसू लागली आहे. निवडणूक म्हटलं की राजकीय टोकाला जाणं नवीन राहिलेलं नाही. मात्र, नवी मुंबईतील घणसोलीत चक्क सोसायटीच्या ईलेक्शनमध्ये रहिवाशांना मारहाण करण्यात आलाचा संतापजनक प्रकार घडला आहे. माथाडी सोसायटीमध्ये गुंडांनी धिंगाणा घालत मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांत नवी मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या […]

Read More

पोटच्या मुलांना विकणारी निर्दयी आई पोलिसांनी आवळल्या मुसक्या, बाप मात्र फरार

नवी मुंबई: नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला राहणारे दाम्पत्य मुलांना जन्म देऊन ती मुले विकत असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार महिला बालविकास विभाग ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या घटनेची माहिती मिळताच महिला बालविकास विभाग आणि नवी मुंबई पोलीस आरोपींना पकडण्यासाठी गेले असता आईला ताब्यात घेतले आहे. मात्र बाप फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपी […]

Read More