Nawab Malik यांना ईडीचा दणका, संपत्ती जप्त करण्यास परवानगी

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आणखी एक दणका दिला आहे. मलिक यांची संपत्ती जप्त करण्याची संमती ईडीला मिळाली आहे. त्यामुळे हा नवाब मलिक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर टाच येणार आहे. मुंबईतल्या गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा भाग, कुर्ला पश्चिम या ठिकाणी असलेल्या तीन फ्लॅट, वांद्रे […]

Read More

“राष्ट्रवादीचा बडा नेता अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार” मोहित कंबोज यांचा इशारा कुणाकडे?

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासोबत दिसणार या आशयाचं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं आहे. एवढंच नाही तर सेव्ह धिस ट्विट असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोहित कंबोज यांचा इशारा नेमका कुणाकडे आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा सुरू झाली […]

Read More

समीर वानखेडेंना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा दिलासा, अनुसुचित जातीत असल्याचा निर्वाळा

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. समीर वानखेडे हे अनुसुचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे बनावाट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता. मात्र समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलासा दिला आहे. […]

Read More

नवाब मलिक यांचा रूग्णालयातला मुक्काम वाढला, जामीन अर्जावरची सुनावणी २४ ऑगस्टला

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांचा रूग्णालयातला मुक्काम वाढला आहे. मुंबई सत्र न्यायालयात त्यांनी जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. त्यावर २४ ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रींग प्रकरणात ईड़ीकडून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर […]

Read More

संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढणार की, जामीन मिळणार?, जुनी प्रकरणं काय सांगतात?

संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) अटक केली आणि न्यायालयाने त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. आज कोठडीची मुदत संपत असून, ईडीकडून त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर केलं जाईल. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण याच्याआधी महाराष्ट्रातले जे नेते ईडीच्या कचाट्यात सापडले, त्यांना बराच काळ जामीनासाठी झगडावं लागलं आणि काही नेत्यांना तर 2 […]

Read More

अनिल देशमुख-नवाब मलिकांना फ्लोअर टेस्टला उपस्थित राहण्यास परवानगी

मुंबई: अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोघांनाही उद्या सकाळी ११ वाजता सभागृहाच्या कामकाजात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. दोन्ही अर्जदार सीबीआय आणि ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन्ही एजन्सींना त्यांना कार्यवाही होईपर्यंत विधानसभेच्या सभागृहात हजर करण्याचे आणि नंतर पुन्हा न्यायालयीन कोठडीत आणण्याचे निर्देश […]

Read More

अनिल देशमुख, नवाब मलिकांची सुप्रीम कोर्टात धाव; मतदानाला परवानगी मिळणार?

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर आता दोघांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या वकिलांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे, सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी २ […]

Read More

विधान परिषद निवडणूक: मतदान करू द्या! अनिल देशमुख-नवाब मलिक पुन्हा कोर्टाच्या दारात

महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांनीही आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क हवा म्हणून नव्याने कोर्टात अर्ज केला आहे. राज्यसभेच्या वेळी या दोघांनाही कोर्टाने मतदानाचा अधिकार दिला नव्हता. त्यानंतर आता २० जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. या मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून दोघांनीही नव्याने अर्ज दाखल केला […]

Read More

राज्यसभा निवडणूक : ‘मविआ’ला झटका! मलिक, देशमुखांना मतदानाला परवानगी नाहीच

मुंबई: राज्यात आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 180 आमदारांनी मतदान केले आहे. मतदान सुरु असताना महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानला जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला 2 आमदारांच्या मताचा फटका बसला आहे. काल (जून ९) पीएमएलए […]

Read More

मलिक-देशमुखांना मतदान नाकारलं, सरळ सोप्प्या भाषेत समजून घ्या सहावा उमेदवार राज्यसभेवर कसा निवडून जाणार

मुंबई: महाराष्ट्रात तब्बल 24 वर्षानंतर राज्यसभेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक आमदाराचं मत हे अत्यंत मोलाचं ठरणार आहे. अशातच सत्र न्यायालयाने ईडीच्या ताब्यात असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नसल्याचा निर्णय सुनावला आहे. कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे राज्यसभा निवडणुकीचं चित्र पुन्हा एकदा […]

Read More