दोन दिवसांपासून खोली बंद, दरवाजा उघडताच सगळेच हादरले, पुण्यात नेमकं घडलं काय?
पुण्यातील लोहगाव परिसरातील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी येऊन दरवाजा तोडताच धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघंही कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला आहे.