Sachin Sawant: ”मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही याचं कारण जनतेला कळलं असेल”

मुंबई: शिवसेना आणि शिंदे गटासह सर्वांचं लक्ष आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाकडे लागले होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी उद्यावरती ढकलली आहे. कोर्टाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी कोर्टाच्या आजच्या सुनावणीवरती आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया […]

Read More

खडसे Vs खडसे लढती आधीच मॅच निकाली आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंचा शाब्दिक प्रहार आणि आव्हान. संजय राऊत यांचा लेटरबॉम्ब किरीट सोमय्या यांची काय असणार प्रतिक्रिया. नाराज सचिन सावंत शिवसेनेत जाणार की काँग्रेसमध्येच वेगळी जबाबदारी मिळणार. जळगाव जिल्ह्यात खडसे विरुद्ध खडसे सामना टळला. देशात लवकरच कोव्हिडच्या 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण होणार. या आणि अशा 5 ट्रेंडिंग बातम्या बघा Live

Read More

नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी; सचिन सावंतांनी दिला राजीनामा

दहा वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र काँग्रेसचं प्रवक्तेपद सांभाळणाऱ्या सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत असलेल्या नाराजीतून हा राजीनामा सचिन सावंत यांनी दिला आहे अशीही चर्चा रंगली आहे. सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षांपासून जास्त काळ प्रवक्ते होते. तरीही […]

Read More

शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद

11 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि लखीमपूर खेरी या ठिकाणी झालेल्या घटनेविरोधात हा बंद पुकारण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली. लखीमपूर खीरा या भागात जे घडलं ती भारतीय […]

Read More

परमबीर सिंहांना वाचवणं भाजपसाठीच गरजेचं; काँग्रेसनं उपस्थित केली शंका

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह कुठे आहेत?, असा प्रश्न विचारला जात असून, यावरून राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपला लक्ष्य करताना दिसत आहे. परमबीर सिंह बऱ्याच दिवसांपासून समोर आलेले नाहीत. त्यातच आता त्यांनी देशाबाहेर पलायन केलं असल्याची चर्चा सुरू झाली असून, असे लोक जेव्हा पळून जातात तेव्हा सरकार झोपलेलंच का असतं, अशी […]

Read More

मोठी बातमी: ‘अनिल देशमुखांविरोधात पुरावे नाहीत, CBI ने दिली होती क्लीनचीट’, सचिन सावंतांचा दावा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे जे आरोप करण्यात आले होते. त्याप्रकरणी सीबीआय प्राथमिक चौकशी केली होती. याच चौकशीअंती सीबीआयने अहवालात स्पष्ट केलं होतं की, अनिल देशमुख यांच्याविरोधात याप्रकरणी कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे पुढील कारवाई थांबविण्यात […]

Read More

Sushant Singh Death : ‘CBI वर दबाव’ काँग्रेसचा आरोप, भाजप म्हणतं सरकार चालवण्यासाठी तुम्ही नालायक ठरलात

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या संशयास्पद मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मागच्या वर्षी याच दिवशी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला होता. सुरुवातीला मुंबई पोलीस या घटनेचा तपास करत होते, त्यानंतर सीबीआयकडे हा तपास वर्ग करण्यात आला. या प्रकरणावरुन महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामना रंगला. सुशांतच्या मृत्यूनंतर आज वर्षभरानेही दोन्ही पक्षांमध्ये […]

Read More

आम्ही भाजपच्या चौकशीची मागणी केली, सेलिब्रिटींच्या नाही-काँग्रेस

आम्ही भाजपच्या चौकशीची मागणी केली आहे, सेलिब्रिटींच्या नाही. भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक मागणीचा विपर्यास करून बोंब ठोकतो आहे. उलट सेलिब्रिटींना भाजपपासून संरक्षण दिलं जावं अशीही मागणी आम्ही केली आहे. देश पातळीवर भाजपकडून लोकशाहीचे मानक पायदळी तुडवले जात आहेत असंही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. आज सकाळीच सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी […]

Read More

भारतरत्नांची चौकशी? ठाकरे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे?-फडणवीस

भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या दोघांच्याही ट्विटबाबत ठाकरे सरकारने गुप्तचर यंत्रणांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या सरकारचं डोकं फिरलं आहे का? असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन यासंदर्भात ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. Disgusting & highly deplorable❗️Where is your Marathi Pride now❓Where […]

Read More

सचिन,लतादीदींवर ट्विट करण्यासाठी केंद्राचा दबाव होता? होणार चौकशी

सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेक सिने कलाकारांना शेतकरी आंदोलनावरून सरकारला पाठिंबा देणारं जे ट्विट करावं लागलं त्यामागे केंद्र सरकारचा दबाव होता का? या गोष्टीची चौकशी आता केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आश्वासन दिलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज झूम कॉलद्वारे अनिल देशमुख यांच्याशी संवाद साधला. या संवादात त्यांनी […]

Read More