NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडेंना हायकोर्टाने दिला दणका

Sameer Wankhede Case: नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) शुक्रवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्याकडे काही बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. वानखेडे यांनी त्यांच्या संपत्तीवर कोणतीही जप्तीची कारवाई करण्यापूर्वी संबंधित कागदोपत्री पुरावे […]

Read More

‘तुमको खतम कर देंगे’; समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी, ट्विटरवरून कुणी केला मेसेज?

एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. या माहितीने खळबळ उडाली असून, समीर वानखेडेंनी याबद्दलची तक्रार मुंबई पोलिसांना दिली आहे. एका ट्विटर हॅण्डलवरून ही धमकी देण्यात आली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे वादात सापडलेले मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत […]

Read More

समीर वानखेडेंना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा दिलासा, अनुसुचित जातीत असल्याचा निर्वाळा

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. समीर वानखेडे हे अनुसुचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे बनावाट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता. मात्र समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलासा दिला आहे. […]

Read More

आर्यन खानवर कारवाई ते क्लिनचीट, नवाब मलिकांची अटक; समीर वानखेडेंची बदली काय घडलं ८ महिन्यात?

२ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. मात्र गेल्या वर्षीचा २ ऑक्टोबर हा दिवस एका वेगळ्याच कारणाने गाजला. कॉर्डिलिया या क्रूझवर एनसीबीने कारवाई केली आणि आर्यन खानसह आठ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली. पुढचा महिनाभर हे प्रकरण गाजत होतं. तर ही कारवाई करणारे त्यावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर असलेले समीर वानखेडे यांची […]

Read More

आर्यन खान प्रकरणामुळे वादात सापडलेल्या समीर वानखेडेंची चेन्नईत ‘नॉन सेंसिटिव्ह’ पदावर बदली

मुंबई एनसीबीचे माजी प्रादेशिक अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईतून चेन्नई येथे बदली करण्यात आली आहे. एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लिन चिट दिल्यानंतर वानखेडेंची बदली करण्यात आलीये. यापूर्वी त्यांची एनसीबीतून उचलबांगडी करण्यात आली होती. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि आर्यन खान अटक यावरून मुंबई एनसीबीचे तत्कालिन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर […]

Read More

Sameer Wankhede : अटक बेकायदेशीर असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई होते?| Aryan Khan

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्लीन चिट दिली आहे. आर्यन खानच्या विरोधात पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याने आर्यन खानला क्लिन चिट देण्यात आली आहे. मात्र आर्यन खानला जेव्हा अटक करण्यात आली होती तेव्हा त्याला २० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात रहावं लागलं होतं. आर्यन खानला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एनसीबीने अटक केली होती. समीर वानखेडे यांच्या […]

Read More

अरबाज मर्चंटच्या जबाबनंतरही केली अटक, आर्यन खानला अडकवायचा कुणाचा होता प्लान?

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लिन चिट देण्यात आली. या प्रकरणात आता एनसीबी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनीही समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून चूक झाल्याचं मान्य केलंय. मात्र, एनसीबीने आर्यनला नेमकं कोणत्या आधारावर अटक केली होती, असा यक्षप्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या […]

Read More

आर्यन खानला क्लिन चिट, समीर वानखेडे, सना मलिक काय म्हणाले?

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कॉर्डिलिया क्रूझचं प्रकरण आणि त्यानंर आर्यन खानवर झालेली कारवाई हे सगळंच गाजलं होतं. आता या प्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला या प्रकरणी क्लिन चीट देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब ही आहे की ही क्लिन चिट आर्यन खानला दिल्ली एनसीबीनेच दिली आहे. यानंतर आता समीर […]

Read More

बारच्या परवान्यासाठी वय लपवल्याचा आरोप, समीर वानखेडेंविरुद्ध गुन्हा दाखल

NCB मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी काहीकेल्या संपायचं नाव घेत नाहीयेत. ठाणे येथील कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडेंविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र दाखवणे, शपथेखालील सरकारी अधिकाऱ्याने खोटी माहिती पुरवणे व अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील बारच्या परवान्यासाठी वय लपवल्याचा आरोप समीर वानखेडेंवर ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब […]

Read More

हेमंत नगराळे यांना समन्स, समीर वानखेडेंना दिलासा

मुंबई तक कॉर्डेलिया क्रुझ ड्रग केसमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केलेल्या समीर वानखेडे यांना दिलासा मिळालाय. तर, मुंबई पोलिस आयुक्तांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समन्स बजावला आहे. समीर वानखेडे यांना दिलासा का आणि मुंबई पोलिस आयुक्त हेमंट नगराळे यांना समन्स का मिळाला हे या व्हिडीओमधून जाणून घ्या.

Read More