Lockdown मुळे पैशाची चणचण, पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

सांगली: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याने सरकारला संचारबंदी आणि लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आहे. पण आता याच लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसताना दिसतो आहे. मिरजमधील येथील एका गरीब कुटुंबातील पती-पत्नीने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खॉंजा बस्ती येथे राहणारे सलीम गौससाहेब भटकळ (वय 47 वर्ष) आणि त्यांची पत्नी मर्यम बशीर नदाफ (वय […]

Read More

धक्कादायक घटना, मळणी मशीनमध्ये अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

सांगली: सांगली जिल्ह्यातील करंजे गावात एक अत्यंत धक्कदायक घटना घडली आहे. शेतात काम सुरु असतानाच मळणी मशीनमध्ये अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभद्रा विलास मदने असं मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. खानापूर तालुक्यातील करंजे येथील मदने मळा येथे मळणी मशिनमध्ये […]

Read More

MPSC च्या निर्णयामुळे राज्यातले विद्यार्थी सरकारविरोधात आक्रमक

MPSC ची १४ मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने ठाकरे सरकारविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या निर्णयाचा फेरविचार केला जावा अशी मागणी काँग्रेसमधून होते आहे. काही वेळापूर्वीच मदन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी MPSC बाबतचा निर्णय हा मला अंधारात ठेवून घेतला गेला असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र पुण्यात या निर्णयाचे पडसाद जसे उमटले तसे राज्यभरातही […]

Read More

नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात माजी सैनिकांची टास्क फोर्स

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता…स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध कडक करायला सुरुवात केली आहे. सांगली महापालिकेने कोरोनाविषयक नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी १५ माजी सैनिकांची टास्क फोर्स नियुक्त केली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुढाकार घेऊन या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. माजी सैनिकांच्या या टास्क फोर्सने सांगलीच्या बाजारपेठेत फिरून नागरिकांना […]

Read More

भिडे गुरूजींच्या ‘शिवप्रतिष्ठान’मधे फूट

सांगली: संभाजी भिडे संस्थापक असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या संघटनेचे कार्यवाह असलेले आणि भिडे गुरुजींंचे उजवा हात असलेले नितीन चौगुले यांनीच ‘शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ या संघटनेची स्थापना केल्याचे रविवारी धारकऱ्यांच्या मेळाव्यात जाहीर केले. शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी नुकतीच नितीन चौगुले यांची संघटनेतून हकालपट्टी केली होती. […]

Read More