एका बेसावध क्षणी मुंबई केंद्रशासित करायची; फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा मोठा आरोप
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्यांचं नाव घेत राऊतांनी आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत न छापल्याच्या कारणावरून राऊतांनी मंगेशकर कुटुंबियांनाही सुनावलं आहे. संजय राऊत रोखठोकमध्ये लिहितात, “२४ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान मोदी लता मंगेशकर […]