‘मॅडम नीट शिकवत नाहीत’, तक्रार करताच शिक्षिकेने 80 विद्यार्थ्यांना बदडले
डोंबिवलीमधील जोंधळे विद्यामंदिरात काही दिवसांपूर्वी नीलम भारमल रुजू झाल्या होत्या. त्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तक्रार करताच शिक्षिकेने विद्यार्थ्यांना लोखंडी गजाने मारहाण करत मोठी शिक्षा केली आहे. त्या शिक्षिकेविरुद्ध आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.