बायकोचा राग थेट ‘खाकी वर्दीवर’; पतीची पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

पती एवढा संतापला होता की त्याने रागात दोन्ही पोलिसांना शिवीगाळ केली, फरफटलं, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली…

Read More

Islamic Hackers: ठाणे पोलिसांसह भारतातल्या सरकारी वेबसाईट्स हॅक

भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच नागपूर इन्स्टिट्युट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे. Thane Police : मुंब्रा पोलीस ठाण्यातील १० पोलीस अधिकारी-कर्मचारी खंडणी प्रकरणी निलंबित मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशातल्या अनेक वेबसाईट्स […]

Read More

Ketki Chitale : केतकी चितळेचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त, ठाणे पोलिसांची कारवाई

अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketki Chitale ) लॅपटॉप (Laptop) आणि मोबाईल (Mobile) जप्त करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी (Thane Police) ही कारवाई केली आहे. याआधी पोलिसांनी तिच्याकडे एक मोबाईल होता तो जप्त केला होता. आता तिचा लॅपटॉप आणि आणखी एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. शरद पवारांविषयी विकृत […]

Read More

केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात, शरद पवारांविषयी विकृत कविता पोस्ट करणं भोवलं

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत मजकूर असलेली पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे शेअर केली होती. या प्रकरणात केतकी चितळेला शनिवारी सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं […]

Read More

नाश्ता देण्यावरून उडाला खटका! ७६ वर्षीय सासऱ्याने सूनेला घातली गोळी

ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सून नाश्ता देत नसल्याच्या रागातून 76 वर्षीय सासऱ्याने गोळी झाडून तिची हत्या केली आहे. काशीनाथ पाटील असं या आरोपी सासऱ्याचं नाव असून या घटनेनंतर तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पाटील कुटुंब ऋतुपार्क भागातील विहंग सोसायटीमध्ये रहायचे. एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असलेल्या काशिनाथ […]

Read More

राज ठाकरेंच्या ‘उत्तर’सभेचा मार्ग मोकळा, ठाणे पोलिसांनी दिली परवानगी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ एप्रिल रोजी ठाणे येथे होणाऱ्या सभेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वात आधी राज ठाकरेंची सभा गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोडवर होणार होती. परंतू ठाणे पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आता राज यांच्या […]

Read More

मोठी बातमी ! राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ एप्रिलला ठाण्यात होणाऱ्या ‘उत्तर’ सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कच्या मैदानावर राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. या भाषणावरुन भाजपचा अपवाद वगळता अन्य पक्षांनी राज ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली होती. अशावेळी ९ तारखेला ठाण्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष […]

Read More

नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भोंदूबाबाला अटक, ठाण्यातली धक्कादायक घटना

जादूटोणा आणि काळी जादू करून भूतप्रेत उतरवण्याच्या बहाण्याने अनेक लोकांना गंडा घालणाऱ्या एका भोंदूबाबाला ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी या भोंदूबाबाच्या दोन साथीदारांना देखील अटक केली आहे. या भोंदू बाबाकडून पोलिसांनी ६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. तसेच या भोंदूबाबाचे अकाऊंट देखील पोलिसांनी जप्त […]

Read More

पतीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, पत्नीने महिलेवर उकळतं तूप टाकलं; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

आपल्या पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पत्नीने महिलेवर उकळतं तूप टाकल्याची घटना ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या महिलेच सहा मार्चरोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर तिच्या घरच्या लोकांनी सोमवारी म्हणेजच १५ मार्चला रात्री उशीरा वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्याच्या लोकमान्य नगरमधील पाडा क्रमांक ४ […]

Read More

मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादात तरुणाची हत्या, तीन मित्रांना अटक

अनेकदा क्षुल्लक कारणांवरुन झालेल्या वादामुळे काहींचा जीव गमावल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. ठाणे शहरात एका तरुणाला मोबाईल चार्जिंग करण्यावरुन झालेल्या वादात आपला जीव गमवावा लागला आहे. सुमीत राऊत असं या तरुणाचं नाव असून त्याच्या मित्रांनीच त्याच्यावर हल्ला केल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीवरुन लोकमान्य नगर भागात राहणाऱ्या साहील आणि अभिषेक या दोन तरुणांमध्ये मोबाईल चार्जिंग करण्याच्या […]

Read More