रत्नागिरीत राजन साळवींच्या गडाला सुरुंग; CM शिंदे एक नगरपंचायत ताब्यात घेऊनच परतले!

रत्नागिरी : एकहाती सत्ता असलेल्या लांजा नगरपंचायतीमध्ये शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला आणि स्थानिक आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे. इथले ठाकरे गटाचे नगराध्यक्ष, ५ नगरसेवकांनी आणि २ अपक्ष नगरसेवकांनी रत्नागिरीतील जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे लांजा नगरपंचायतीवरही शिवसेनेचे एकहाती […]

Read More

Uday Samant : प्रकल्प नेमके कोणामुळे गेले? माजी न्यायाधीशांची समिती करणार चौकशी

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि विरोधकांच्या आरोपांना माजी न्यायमूर्ती अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून उत्तर देणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. ही तीन सदस्यांची समिती असून गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे, असेही सामंत यांनी सांगितलं. ते बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सामंत म्हणाले, काल झालेली […]

Read More

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला कोयनेतून पाणी पुरवणार : उद्योगमंत्री सामंत यांची घोषणा

मुंबई : राजापूरमधील प्रस्तावित बारसू-सोलगाव येथील रिफायनरीला सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून पाणी पुरवठा करण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी बैठकीतील रिफायनरीबाबत घेण्यात आलेल्या इतरही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये रिफायनरीसाठी सुरु असलेल्या भुसंपादनची आणि रिफायनरी कशा पद्धतीने होणार आहे […]

Read More

FoxConn चा प्रकल्प शिंदे-फडणवीसांमुळे गुजरातला? उदय सामंत म्हणाले…

भविष्यातील औद्योगिक विकासात आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रोजेक्ट गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सर्व प्रक्रिया झाली होती, असं ठाकरे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाईंनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. शिंदे फडणवीस सरकारमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे असा आरोप होतो […]

Read More

आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर : कदम, सामंतांची कुंडली काढण्याचे जाधव अन् दळवींचे आव्हान

हिंगोली : उदय सामंत सारखा भंपक माणूस मी बघितला नाही. मागच्या वेळी गाडीवर दगडफेक झाली असं सांगून पोलीस संरक्षण वाढवून घेतलं, थोरात यांच्यावर आक्षेप घेऊन संरक्षण वाढवून घेतलं, त्याअगोदर सुद्धा मला आठवते, अशी काही स्टंटबाजी करायची. उदय सामंतला धमक्या द्यायला, कोण आहे उदय सामंत? कुणाशी प्रामाणिक राहिले? असाही सवाल शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला. […]

Read More

उदय सामंतांचे भाऊ विनायक राऊतांना आव्हान देणार? शिंदे गटातील बड्या नेत्यानं स्पष्ट सांगितलं

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आगामी उमेदवार म्हणून मागील काही दिवसांपासून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होतं आहे. यावर आज शिंदे गटातील बडे नेते आणि माजी खासदार सुधीर सावंत यांनी स्पष्टपणे भाष्य केलं. कणकवली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुधीर सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा […]

Read More

Uday Samant म्हणतात मविआचे १२ ते १३ आमदार आमच्या संपर्कात

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार फुटणार आहेत असा दावा केला होता. त्यांच्यावर नाना पटोलेंनी टीकाही केली. एकीकडे या सगळ्या गोष्टी घडत असतानाच महाविकास आघाडीचे १२ ते १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. काय म्हटलं आहे उदय सामंत यांनी? […]

Read More

Uday Samant: ”प्रति शिवसेना भवन उभारण्याचा आमचा मानस नाही, पण…”

राकेश गुडेकर, रत्नागिरी, प्रतिनिधी रत्नागिरी: शिंदे मंत्रिमंडळाचा मिनी विस्तार झालेला आहे. आता फक्त खातेवाटप राहिलेलं आहे. शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर सतत उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्यात येत आहे. मग कायदेशीर असो की संघटनात्मक. मागच्या काही दिवसांपासून एक बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे ती म्हणजे एकनाथ […]

Read More

Uday Samant यांचा दावा “टाटा एअरबसचा प्रकल्प वर्षभरापूर्वीच गुजरातला गेला”

महाराष्ट्रातला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं होतं. अशात नागपुरात येणारा टाटांचा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटींचा हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका सुरू झाली आहे. अशात हा प्रकल्प आज नाही तर वर्षभरापूर्वीच गुजरातला गेला अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी […]

Read More

Tata Airbus : ४ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, उदय सामंत राजीनामा देणार का? – आदित्य ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला ‘टाटा एअरबस’ हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे. लष्करी विमान निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश ही भाजपशासित राज्यही प्रयत्नशील होती. अखेरीस हा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यामध्ये होणार असल्याची माहिती आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दिली. तसंच या प्रकल्पाची पायाभरणीही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. टाटा […]

Read More