Uddhav Thckeray पाळत ठेवत असल्याच्या आरोपांवर नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवत आहेत असे आरोप करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले यांचं म्हणणं असं आहे की आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझे आरोप राज्य सरकारवर नाही तर केंद्र सरकारवर होते असं सांगत नाना पटोले यांनी माध्यमांवर या प्रकरणाचं खापर फोडलं […]

Read More

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, सरकारने जाहीर केली नवी नियमावली

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ पाहता राज्य सरकारने रविवारी रात्रीपासून संचारबंदीची घोषणा केली आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. ही वाढ पाहता राज्यातली आरोग्यव्यवस्था कमी पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चिंताजनक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या […]

Read More

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता, मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील सर्व खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश जाहीर करण्यात आले आहेत. आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांना मात्र यामधून वगळण्यात आलंय. याचसोबत सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील विभाग प्रमुख व कार्यालयानी प्रमुखांनी कोविडची परिस्थिती लक्षात […]

Read More

सचिन वाझे प्रकरणाची तार मातोश्रीशी – नवनीत राणांचा हल्लाबोल

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने मुंबई पोलिसांचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत सरकारला पूर्णपणे बॅकफूटला ढकललं. NIA ने वाझेंना अटक केल्यानंतरही विरोधक सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीका करणं थांबवत नाहीयेत. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीही सचिन वाझे प्रकरणाची तार […]

Read More

पाणी कुठेतरी मुरतंय ! वाझे प्रकरणात मेटेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतरही विरोधीपक्ष नेते सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. भाजपने आज शिवसेनेवर चौफेर हल्लाबोल केला. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना वसुलीसाठी माणूस हवा होता म्हणून वाझेंना संधी देण्यात आली असं म्हटलं. भाजपचा सहयोगी पक्ष शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायम मेटे यांनीही आज सचिन वाझे प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. […]

Read More

सचिन वाझेंना अटक : फडणवीसांनी शेरलॉक होम्ससारखा तपास केला पण…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुनसुथ हिरेन प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ सुरु आहे. शनिवारी रात्री NIA च्या पथकाने अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधकांनी वाझे यांना अटक व्हावी यासाठी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. या सर्व घडामोडींवर संजय राऊत यांनी सामना मधील ‘रोखठोक’ या आपल्या सदरात […]

Read More

कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका, ठाकरेंचा हॉटेल चालकांना इशारा

राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेला कोरोना विषाणूचा संसर्ग राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक महत्वाच्या भागात सरकारने लॉकडाउन जाहीर केलं असून काही भागांत संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यातील हॉटेलचालकांनाही राज्य सरकारने निर्बंध घालून दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, […]

Read More

नागपूर : शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख चढताच, ७ जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात सातत्याने वाढ होत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे स्थानिक प्रशासनासमोरचे धाबे दणाणले आहेत. गेल्या २४ तासांत शहरात २ हजार २६२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. ७ जणांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झालेला आहे. भंडाऱ्यात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरमध्ये १५ मार्चपासून २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या […]

Read More

बुलडाणा : जेवण न मिळाल्यामुळे रुग्ण कोविड सेंटरबाहेर

विदर्भात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता…जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. परंतू बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील विसावा भवन कोविड सेंटरमधील कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण जेवण मिळत नसल्यामुळे रस्त्यावर आले होते. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना कंत्राटदाराकडून योग्य वेळेत जेवण पुरवलं जात नसल्यामुळे नाराज झालेल्या रुग्णांनी रस्त्यावर येऊन निदर्शन केली. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना […]

Read More

राज ठाकरे म्हणतात, नाणार प्रकल्प राज्याबाहेर जाणं परवडणारं नाही!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कोकणातील रत्नागिरी-राजापूर रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. कोरोनानंतर राज्याच्या अर्थकारणाला गती द्यायची असेल तर रत्नागिरी-राजापूर रिफायनरीसारखे प्रकल्प हातातून गमावणं राज्याला आणि कोकणाला परवडणारं नसल्याचं पत्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लिहीलं आहे. कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची […]

Read More