संतोष बांगर म्हणजे हिंगोलीचा नवा सलमान खान : शिवसेना जिल्हाप्रमुखांनी दिली उपमा

हिंगोली : कावड यात्रेत शर्ट काढून दंड थोपटतो. गणपतीच्या मिरवणुकीत कपडे काढून दंड दाखवतो. दोन्ही बाजूंनी वाढलेले केस, अरे काय ते आमदार…. घटनात्मक पद आहे, याची काही किंमत असायला पाहिजे. व्यायाम शाळेत जिथे आपण शरीर साधना करतो तिथे हे मटका, पत्ते खेळतात, ही काय प्रथा आहे. असे म्हणत हिंगोलीचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी […]

Read More

सामना अग्रलेख : PM नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप

मुंबई : “देशात भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवायांमुळे राजकारणात नवे ध्रुवीकरण सुरू झाले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना वाचविण्यासाठी काही राजकीय गट संघटित होत आहेत. त्यांच्यापासून देशातील आणि केरळच्या जनतेला सतत सावध राहावे लागेल.” असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यावर असताना केले होते. त्यांच्या याच विधानावर आता “नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप […]

Read More

राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रात तीन वर्ष पूर्ण : तीन पुस्तकांच्या प्रकाशनाने सेलिब्रेशन

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून ३ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आज मुंबईमध्ये राजभवनात हे सर्व […]

Read More

बुलढाणा : ठाकरे-शिंदे गटात तुफान राडा; आमदार पुत्रांकडून मारहाण झाल्याचा आरोप

बुलढाणा : शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हा वाद आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचला आहे का? असा सवाल सध्या बुलढाण्यात विचारला जात आहे. बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे गटाच्या कार्यक्रमावर काही तरुणांनी अचानक हल्ला केला. यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, […]

Read More

“शिवसेना-संभाजी ब्रिगेडची सत्ता आणणार” : ठाकरेंच्या मागे मराठा सेवा संघाचेही पाठबळ

उस्मानाबाद : गणेश जाधव उस्मानाबाद : शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीनंतर उद्धव ठाकरे यांना आता मराठा सेवा संघाचेही पाठबळ मिळणार आहे. संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असणाऱ्या मराठा सेवा संघाने आज त्यांच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेला पाठिंबा जाहिर केला आहे. तसेच राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मराठा सेवा संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे यांनी […]

Read More

“CM शिंदेंकडे बाळासाहेबांचे तर उद्धवजींकडे पवारांचे विचार” : रामदास कदम यांचा हल्लाबोल

खेड : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरु आहेत. अशातच शिवतीर्थावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी केली आहे. रामदास कदम खेडमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बोलत होते. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार हा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार […]

Read More

Shivsena : ठाकरेंकडून दोन निष्ठावंत मावळ्यांना प्रमोशन : पराग डाकेंवरही नवी जबाबदारी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटनेत काही बदल केले आहेत. यामध्ये खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी वर्णी लागली आहे. तर शिवसेनेचे जेष्ठ नेते लीलाधर डाके यांचे पुत्र पराग डाके यांना पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शिंदेंच्या बंडानंतरही निष्ठावंत राहिलेल्या मावळ्यांना प्रमोशन […]

Read More

साळवी-राऊतांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी : रिफायनरीवरील शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : कोकणातील बहुचर्चित बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या शिवसेनेमध्येच अंतर्गत संघर्ष सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी या दोन नेत्यांमध्ये रिफायनरी प्रकल्पावरुन पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून दोघांमध्ये सुरु असलेला हा वाद अद्यापही धुमसत आहे. आमदार राजन साळवी […]

Read More

Narayan rane -‘शाब्बास एकनाथजी… तुझाही आनंद दिघे झाला असता’, त्या ट्विटने महाराष्ट्रात खळबळ

मुंबई: राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचं प्रचंड मतं फुटल्याने सरकारमध्ये चलबिचल पाहायला मिळाली अशातच शिवसेनेचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या साधारण 30 आमदारांनासोबत घेऊन गुजरातमधील ला मेरिडियन हॉटेलमध्ये मध्यरात्री गेले असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असताना भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी […]

Read More

मातोश्री बाहेरच्या 80 वर्षांच्या आजींची पुष्पा स्टाईल मुलाखत

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणांच्या मुंबईतील खार येथील घराबाहेर बरंच तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कारण राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात ठाण मांडून बसले आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीबाहेर देखील शेकडो शिवसैनिक काल रात्रीपासूनच बसून […]

Read More