‘Adipurush’ च्या निराशाजनक कामगिरीनंतर, प्रेक्षकांचा कोणत्या चित्रपटाकडे वाढला कल? कमाईत मोठी झेप!
विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ (Hatke Jara Bachake) हा या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. ‘मिमी’ आणि ‘लुका छुप्पी’ सारखे चित्रपट करणाऱ्या लक्ष्मण उतेकर यांना या चित्रपटाकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. पण या कौटुंबिक विनोदी चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिस कलेक्शनसह लोकांना आपलसं केलं. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.