
हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) सूप वाजले. शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या उत्तरातील काही मुद्द्यांवर बोट ठेवत अजित पवारांनी शिंदेंना चिमटे काढले. यावेळी त्यांनी दीपक केसरकरांचं टोले लगावत कौतुक केलं.