कर्नाटकात काँग्रेसनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एकहाती सत्ता खेचून आणली. या विजयाचं बहुतांश श्रेय कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांना दिलं जातं. साहजिकच सध्या कर्नाटक काँग्रेसची तुलना महाराष्ट्र काँग्रेसशी केली जातीये. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कर्नाटक काँग्रेससारखी एकहाती सत्ता मिळवण्याची ताकद आहे का? महाराष्ट्र काँग्रेसमधील डी.के.शिवकुमार कोण? महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांत काँग्रेस एकहाती सत्ता का मिळवू शकला नाही याच गोष्टींवर सविस्तर चर्चा करुयात या व्हीडीओद्वारे.