आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपत पुन्हा इनकमिंग वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस याबद्दल भाष्य केलं होतं. त्यामुळे पक्षातील इच्छुकांचं काय होणार असाही प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजपची दारं खुली असली, तरी सगळ्यांच इच्छुकांना तिकीट मिळणार नाही, म्हणत स्पष्ट संदेश दिला.