धनंजय मुंडे : 'तुमच्या अर्धवटपणामुळेच आमच्यावर कामे पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी'

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण-भावांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांची औकात काढली होती. त्यावरून दोघांमधलं कुरघोडीचं राजकारण पुन्हा चव्हाट्यावर आलं होतं.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा बहीण पंकजा मुंडे यांना खोचक टोला लगावला. त्यांनी सगळी काम अर्धवट अर्धवट सोडून दिली. ती कामे पूर्णत्वास न्यायची जबाबदारी आमच्यावर आली नसती, असं म्हणत नाव न घेता पंकजा मुंडेंना टोला लगावला. अंबाजोगाई पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण शनिवारी 25 डिसेंबरला धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in