Gulab Cyclone : मराठवाड्यात महापूर; उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम : महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस
Gulab Cyclone : मराठवाड्यात महापूर; उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस

मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळाचे परिणाम दिसू लागले आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये महापूरसदृष्य स्थिती निर्माण झाली.

अनेक गावांमध्ये पूराचे पाणी घुसले. उस्मनाबाद, लातूर, बीड, हिंगोली जिल्ह्यांमध्ये नदीकाठच्या गावांना पूराचा वेढा पडला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 'गुलाब' चक्रीवादळाची निर्मिती झाली. हे वादळ आंधप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला धडकलं असून इथे मुसळधार पाऊस सुरु आहे.

याच वादळाचा परिणाम हा महाराष्ट्रातील मराठवाड्यात दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून इथे जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु असून मराठवाड्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मराठवाड्यातील पूराचे ही दृश्य पाहा -

Related Stories

No stories found.