बारामतीत अजित पवारांचे निकटवर्तीय गोयंका ग्रुपच्या कंपनीवर आयकर विभागाचे छापे

बारामतीतल्या सायबर डायनामिक्स कंपनीमध्ये इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी तळ ठोकून
बारामतीत अजित पवारांचे निकटवर्तीय गोयंका ग्रुपच्या कंपनीवर आयकर विभागाचे छापे
India Today

बारामतीमध्ये आज सकाळपासूनच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरू केले. बारामती शहरात दोन ठिकाणी या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून माहिती घेतली दरम्यान बारामतीतल्या सायबर डायनामिक्स या कंपनीमध्ये अजूनही इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी तळ ठोकून आहेत. तब्बल सहा तासांहून अधिक काळ कंपनीच्या आत मध्ये इन्कम टॅक्स विभागाचे सहा ते सात अधिकारी अधिकारी आणि सीआरपीएफ जवान असे बारा पेक्षा जास्त लोक आहेत. ही चौकशी किती काळ चालेल याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही

Related Stories

No stories found.