257 कोटी आणि सोनं-चांदी, अत्तर व्यापाऱ्याकडचं घबाड पाहून चक्रावून जाल

स्कूटर चालवणाऱ्या अत्तर व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
257 कोटी आणि सोनं-चांदी, अत्तर व्यापाऱ्याकडचं घबाड पाहून चक्रावून जाल

257 कोटींची नोटा, 20 किलोचं सोनं-चांदी. एका अत्तर व्यापाऱ्याकडील ही संपत्ती पाहून तुमचेही डोळे चक्रावले असतील. इतका पैसा की नोटा मोजायला 8 मशीन्स आणाव्या लागल्या. इतका पैसा की नोटा जप्त करायला ट्रक बोलवावा लागला. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये पियूष जैन या अत्तर व्यापाऱ्याकडे आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात हे घबाड मिळालंय. पियूष जैनच्या घरात एक तळघर आढळलं आहे तसंच एका फ्लॅटमध्ये 300 चाव्याही सापडल्या आहेत. 50 तास झालेल्या चौकशीनंतर पियूष जैनला कर चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in