महाड तालुक्यातील तळई गावामध्ये काल रात्री दरड कोसळली होती. आज सकाळी येथे एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात झाली. आतापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून 36 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 30 ते 40 जण या ठिकाणी अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दरडीखाली 30 ते 35 घरे दबल्याची भीती होती. मात्र पूरपरिस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने बचावकार्य सुरु करण्यात आले नव्हते. आज सकाळी पूराचे पाणी ओसरायला लागल्यानंतर लगेचच या ठिकाणी स्थानिकांच्या व एनडीआरएफ च्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले.
आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय
By मुंबई तक
30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक
By मुंबई तक
चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं?