
विधान परिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्यानं मत फुटीची भीती राजकीय पक्षांना सतावू लागलीय. भाजपबरोबर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षानी आमदारांबद्दल खबरदारी घेण्यास सुरवात केलीय. महाविकास आघाडी सहावी जागा जिंकणार की, भाजप राज्यसभेप्रमाणेच आघाडीला मात ५वी जागा मिळवणार यांचीच चर्चा सध्या होतेय. अशातच आता केवळ भाजप आणि मविआमध्येच फोडाफोडी सुरू नाही, तर मविआतच मतांची फोडाफोडी सुरू असल्याचं समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा शिवसेनेच्या मतांवर डोळा असल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या फोडाफोडीवर तीव्र नाराज आहेत. पण याचमुळे आता आघाडीत बिघाडीची चर्चा रंगलीय