'धर्मवीर'च्या शुटिंगवेळी एकनाथ शिंदेंच्या बंडाची कल्पना होती का? प्रसाद ओक काय म्हणाला?

prasad oak interview : धर्मवीर चित्रपटाबद्दल प्रसाद ओकची 'मुंबई Tak' वर खास मुलाखत

'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट गेल्या काही महिन्यात बराच चर्चेत राहिला. या सिनेमाचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले गेले. त्याबद्दल अजूनही बोललं जातंय. कारण एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड. चित्रपटानंतर शिंदेंनी बंड केल्यानं त्याचा या चित्रपटाशीही संबंध लावला जातोय. या चित्रपटात आनंद दिघेंची मुख्य भूमिका साकारली ती अभिनेता प्रसाद ओकने. हा चित्रपट मिळण्याची गोष्ट प्रसाद ओकने उलगडून सांगितलंय. त्याचबरोबर त्याला एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यानं उत्तर दिलं.

Mumbai Tak
www.mumbaitak.in