
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) १७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ठाण्यात जाहीर सभा पार पडली. शिवसेनेच्या (Shivsena) निर्णयानंतर ठाकरे यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. याशिवाय राज्यातील अर्थसंकल्प, आगामी मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) आणि मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ला या प्रकरणांवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. काय म्हणाले राज ठाकरे?