Video: 'पोरांचे बाप बदलतात.. अरे खरं तर बोला... खोटारडे', रुपाली पाटलांचा रुद्रावतार

Rupali Patil Video: कसब्यात धंगेकरांचा विजय होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
रूपाली पाटील भाजपवर संतापल्या

पुणे: पुण्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे या भाजपविरोधात खूपच आक्रमक झाल्या. मुंबई Tak सोबत बोलताना रुपाली पाटलांनी भाजपवर प्रचंड जोरदार हल्ला चढवला. यावेळी रुपाली पाटील खूपच संतापलेल्याही दिसून आल्या.

रूपाली पाटील-ठोंबरेंचा रुद्रावतार, पाहा नेमकं काय म्हटलं...

'राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (UBT) एकजूट आहे म्हणून यांना त्रास होतो. आम्ही काय काम केलं ते आमच्या आमदाराला काय माहितीए.'

'भाजपला राक्षसी बहुमत मिळाल्यावर कामं करायला पाहिजे होती. सबका साथ.. सबका विकास.. उपमुख्यमंत्री येऊन कसब्यात धर्माच्या गोष्टी करतात.. अहो लाजा वाटल्या पाहिजे..'

'लोकाची पोरं आणायची.. त्यांची बापाची नावं जोडून आमची पोरं... आमची पोरं.. ही म्हणणारी ही भाजप.. आणि यांनी शिकवावं का.. बेगानी शादी मैं.. अब्दुल्ला दिवाना.. अरे खरं तर बोला.. खऱ्याची आहेत तर.. खोटारडे..' असं रुपाली पाटील यावेळी म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in