कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचाली वाढल्या. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीपासूनच महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा सुरू झाली. त्यावरून आता तिन्ही पक्षातील नेते वेगवेगळी विधाने करत आहेत.