Thackeray-Pawar यांच्या पत्रानंतरही कारवाया सुरूच; मोदींचा स्पष्ट संदेश?

Uddhav Thackeray आणि Sharad Pawar यांच्यासह ९ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानंतरही ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरुचं.
Uddhav Thackeray आणि Sharad Pawar यांच्यासह ९ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं.
Uddhav Thackeray आणि Sharad Pawar यांच्यासह ९ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं.मुंबई TAK

Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray :

मुंबई : शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह ९ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिल्यानंतरही सीबीआय (CBI) आणि ईडीच्या (ED) कारवाया सुरुच असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे यातून मोदींनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिल्याची चर्चा आहे. (After Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray, NCP president Sharad Pawar wrote a letter to PM Narendra Modi, it appears that CBI and ED operations are continuing.)

५ मार्चला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं. यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया फक्त विरोधकांवरच होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवाय भाजपसोबत जातात त्यांच्यावरच्या कारवाया मात्र थंडावतात, निवडणुकांदरम्यान होणारी अटक किंवा छापेमारी राजकीय हेतूने प्रभावित असते, लोकशाही नाही तर हुकूमशाही मार्गाने जात आहोत, असं दिसतं, असे दावेही या पत्रात करण्यात आले होते, मात्र त्यानंतरही या कारवाया सुरु असल्याचं दिसून येतं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in