
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाची बीजं 'विजयबापू शिवतारेनंचं' घातली होतं. साडेचार तास नंदनवनला बसलो होतो, असं म्हणतं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. दरम्यान, शिवतारे यांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आतेबहिण किर्ती फाटक यांनी विजय शिवतारे सुपर गद्दार आहेत असं म्हणतं संताप व्यक्त केला आहे.