‘स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं, कंगना खरंच बोलली!’ विक्रम गोखलेंची जीभ घसरली

'१५ ऑगस्ट १९४७ रोजी जे मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं, तर भीक होती. भारत २०१४ मध्ये स्वतंत्र झाला', हे अभिनेत्री कंगना रनौतचं विधान चांगलंच वादात सापडलंय. विक्रम गोखले यांनी कंगनाच्या सुरात सूर मिसळलाय.

'१५ ऑगस्ट १९४७ रोजी जे मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं, तर भीक होती. भारत २०१४ मध्ये स्वतंत्र झाला', या अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या विधानावरून वाद सुरू असतानाच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं आहे. 'कंगना जे बोलली ते खरंय, तिच्या मताशी मी सहमत आहे', असं अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते विक्रम गोखले हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in