Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार योजना का सापडलीय वादात?

लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यांतील शेकडो हेक्टर जमीन नदीच्या पाण्याखाली गेलीय. मराठवाड्यातील महापूर हा जलयुक्त शिवारच्या कामामुळे आल्याचा आरोप पर्यावरण तज्ञांकडून केला जातोय.

गुलाब चक्रीवादळाचा मराठवाड्याला मोठा फटका बसलाय. लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यांतील शेकडो हेक्टर जमीन नदीच्या पाण्याखाली गेलीय. मराठवाड्यातील महापूर हा जलयुक्त शिवारच्या कामामुळे आल्याचा आरोप पर्यावरण तज्ञांकडून केला जातोय. पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर टीका केलीय. जलयुक्त शिवार योजना वादात सापडलीय. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टवरील हा आरोप फेटाळून लावला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in