धनंजय महाडिक की संजय पवार, सहाव्या जागेवर कोण बाजी मारणार?

राज्यसभेसाठी मतदान होत नाही. पण सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेत. यंदा तब्बल 10 वर्षांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक होतेय.
धनंजय महाडिक की संजय पवार, सहाव्या जागेवर कोण बाजी मारणार?
Rajya Sabha ElectionRajya Sabha Election

बाप दाखव नाही, तर श्राद्ध कर, ही म्हण खूप फेमस आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते. निवडून आणण्याची ताकद असेल तरच उमेदवार दिला जातो. सगळेजण आपापली ताकद ओळखून असतात. त्यामुळे राज्यसभेसाठी मतदान होत नाही. पण सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेत. यंदा तब्बल 10 वर्षांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक होतेय. शिवसेना-भाजप आमनेसामने आलेत. अत्यंत चुरस निर्माण झालीय. आमदारांच्या खरेदीविक्रीची चर्चा सुरू झालीय. त्यामुळेच आपण कोणाकडे किती मतं आहेत, सहाव्या जागेसाठी कोणाला किती मतं कमी पडत आहेत आणि कोणाचं पारडं जड आहे, हेच या व्हिडिओत बघणार आहोत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in