उद्धव ठाकरेंकडे शिवसेना पक्षप्रमुख नाही, शिंदे गटाचा स्फोटक दावा

Central Election Commission Hearing LIVE: शिवसेना पक्ष कोणाचा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु असून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे दिग्गज वकील जोरदार युक्तिवाद करत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणी LIVE
केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणी LIVE

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने एक महिना पुढे ढकलेली असताना दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगात चिन्ह आणि पक्षाबाबत आज राजधानी दिल्लीत सुनावणी सुरू आहे. त्यामुळे नेमकी शिवसेना कोणाची ठाकरे की शिंदेंची हे आता लवकरच स्पष्ट होईल. पाहा या सुनावणीत नेमकं काय सुरु आहे.

निवडणूक आयोगातील सुनावणीमधील LIVE Update:

 • केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांनी म्हणजे ठाकरे आणि शिंदे गटांनी शाखाप्रमुख, संपर्कप्रमुख तसेच जिल्हाप्रमुख यांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली.

 • याचवेळी शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या अनेक कागदपत्रांवर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

 • शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेले कागदपत्रं ही बनावट असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

 • बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना पक्षाच्या घटनेत केलेले बदल बोगस आणि बेकायदेशीर होते: महेश जेठमलानी (शिंदे गटाचे वकील)

 • बाळासाहेबांच्या निधनानंतर अधिकार स्वत:कडे ठेवणं बेकायदेशीर: महेश जेठमलानी (शिंदे गटाचे वकील)

 • उद्धव ठाकरेंकडे असलेलं शिवसेना प्रमुखपद हे देखील बेकायदेशीर आहे: महेश जेठमलानी (शिंदे गटाचे वकील)

 • शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेब ठाकरेंवर केंद्रीत होती: महेश जेठमलानी (शिंदे गटाचे वकील)

 • उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही: महेश जेठमलानी (शिंदे गटाचे वकील)

 • धनुष्यबाण चिन्ह कुणाचं हे आधी ठरवावं लागेल: मनिंदर सिंग (शिंदे गटाचे वकील)

 • तातडीने चिन्हाचा निर्णय तातडीने घेण्यात यावा:मनिंदर सिंग (शिंदे गटाचे वकील)

 • धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळायला हवं: मनिंदर सिंग (शिंदे गटाचे वकील)

 • सादिक अली केसप्रमाणे निकाल येणं अपेक्षित आहे.: मनिंदर सिंग (शिंदे गटाचे वकील)

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in