
औरंगाबादच्या निवडणुका जवळ आल्या की नामांतराचा मुद्दा येतो. तसं बघायला गेलं तर 1988 पासून याची चर्चा सुरू आहे, मध्यंतरीच्या काळात नामांतराची अधिसूचनाही निघाली होती. पण मग प्रश्न पडतो की घोडं अडलं कुठे? सध्या तरी सामनामध्ये असो किंवा शिवसेना नेते, शिवसैनिक सगळेच औरंगाबादचा उच्चार संभाजीनगर करतात. अगदी सरकारी निर्णयांची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून सोशल मीडियावर दिली जाते, त्यातही उल्लेख संभाजीनगर करण्यात येतो. 1988 मध्ये घोषणा, 95 मध्ये युतीच्या सरकारमध्ये अधिसूचना, त्यानंतर पुन्हा 2014 मध्ये सेना-भाजपची सत्ता येऊनही औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर का नाही होऊ शकलं? जर जोशी सरकारने अधिसूचना काढलेली तर त्याचं पुढे काय झालं? का औरंगाबादच्या नामांतराची मागणी होतेय, याच सगळ्या गोष्टी समजून घेऊयात.