‘शिवसैनिक’ सुभाष साबणे भाजपमध्ये जाताना ढसाढसा रडले!

देगलूर बिलोलीचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी सोमवारी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप प्रवेशाच्या सोहळ्यातच शिवसैनिक सुभाष साबणे रडले. शेकडो लोकांपुढे त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. शिवसेनेला जय महाराष्ट्र करताना शिवसैनिक म्हणून असलेल्या साबणेंना आठवणींचा हुंदका दाटून आला. देगलूर बिलोलीचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी सोमवारी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झाल्यानं देगलूर मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. पोटनिवडणुकीत ज्याचा विद्यमान आमदार त्याची जागा या सुत्रानुसार महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आलीय. त्यामुळेच यावेळी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा नेहमीचा सामना देगलूरमध्ये बघायला मिळणार नाही.

Related Stories

No stories found.