Photo Credit: instagram

गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर? पत्नी सुनीताला आली शंका... 

Photo Credit: instagram

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सुनिताने आता एक असं विधान केलं आहे की, ज्यामुळे त्यांच्यातील वाद गंभीर असल्याचं बोललं जात आहे.

Photo Credit: instagram

Deccan Talks With Asif शी झालेल्या संभाषणात सुनीताने गोविंदासोबतच्या तणावाबाबत भाष्य केलं. तिच्या पतीसोबतच्या सध्याच्या संबंधांबद्दल विचारले असता, तिने म्हटलं की, त्यांच्या नात्याचा नजर लागली आहे.

Photo Credit: instagram

सुनीता म्हणाली की, ती कोणालाही तिचा नवरा हिरावून घेऊ देणार नाही. जोपर्यंत ती जिवंत आहे, तोपर्यंत ती तिच्यापासून गोविंदाला वेगळं होऊ देणार नाही, मग ते कोणीही असले तरीही.

Photo Credit: instagram

सुनीता म्हणाली की, ती पूर्वी गोविंदावर विश्वास ठेवायची. पण आता मात्र त्याबाबत ती खात्रीने सांगू शकत नाही.

Photo Credit: instagram

सुनीताचे हे शब्द ऐकल्यानंतर, यूजर्संना असं वाटते की, ती अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांकडे इशारा करतेय. अलीकडे अशीही चर्चा होती की, गोविंदा एका मराठी अभिनेत्रीला डेट करत आहे.

Photo Credit: instagram

सुनीता म्हणते - 'जो कोणी एखाद्याचं घर उद्ध्वस्त करतो, कुटुंब उद्ध्वस्त करतो, महिला आणि मुलांना त्रास देतो, त्यापेक्षा वाईट कृत्य असू शकत नाही.'

Photo Credit: instagram

'कारण जेव्हा देवाची काठी लागते तेव्हा आवाज होत नाही. तुम्ही एखाद्याच्या पत्नी आणि मुलांना दिलेले दुःख तुमच्याकडे परत येते.'

Photo Credit: instagram

बरेच लोकांना वाटतं की, 'माझे तर कुटुंब नाही, माझ्या धाकट्या भावाचे कुटुंब इतके चांगले का आहे. त्यामुळे त्याचं काही चांगलं होऊ नये.. पण असा विचार करणाऱ्या लोकांना देवाच्या क्रोधाला सामोरं जावं लागतं.'

Photo Credit: instagram

'पण आज लोक पैशाच्या लोभापायी आपले कुटुंब उद्ध्वस्त करत आहेत. जो आपले कर्म योग्यरित्या करत नाही त्याची देव काळजी घेईल. लोकांना नंतर त्यांचे काय होईल हे दिसत नाही.' असंही सुनिता यावेळी म्हणाली.

पुढील वेब स्टोरी

स्वप्नात 'हे' 3 पक्षी दिसले की, समजून तुम्ही होणार प्रचंड...

इथे क्लिक करा