Arrow

गौरी ओरडत होती, अन् रडतही होती, शाहरुखची एक भयानक आठवण

Arrow

शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून ओळखलं जाते. या दोघांना 3 मुलं आहेत. दोन मुलगे आर्यन आणि अबराम आणि एक मुलगी जिचं नाव सुहाना खान आहे.

Arrow

शाहरुख आणि गौरी यांचे त्यांच्या तीनही मुलांबरोबर अगदी खास नाते आहे. मात्र  किंग खानने एकदा गौरीच्या पहिल्या डिलिव्हरीचा अनुभव त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला होता.

Arrow

गौरी खानने 12 नोव्हेंबर 1997 रोजी मुलगा आर्यनला जन्म दिला होता. सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या अपत्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या होत्या.  गौरी जेव्हा पहिल्यांदा गरोदर राहिली होती, तेव्हा शाहरुख खानने तिची विशेष अशी काळजी घेतली होती. 

Arrow

शाहरुखने एकदा सांगितले होते की, गौरीला प्रसूती वेदना होत असताना त्या वेदना महिलांना कशा होतात ते मी पाहिले नव्हते. मात्र गौरीच्या पहिल्या अपत्यावेळी मी ते पाहिलं होतं.

Arrow

त्यावेळी गौरीला नीट श्वास पण घेता येत नव्हता. त्यावेळी गौरी खूप विचित्रपणे ओरडत होती, अगदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे ती ओरडत होती.

Arrow

शाहरुखच्या त्या आठवणीनंतर गौरीनेही सांगितले की, शाहरुखला प्रसूती वेदना काय होतात हे माहिती नव्हते, मात्र त्याला हेही माहिती नव्हते की, सिझेरियन झाल्यानंतर जास्त वेदना होत नाहीत. कारण आर्यनचा जन्म सिझेरियन ऑपरेशन करुन झाले होते.

Arrow

प्रसूतीच्या वेदना होताना महिला हलका श्वास घेतात हे त्याने फक्त चित्रपटात पाहिले होते,  असं त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. मात्र सिझेरियन झाल्यानंतर काय होतं ते त्याला माहिती नव्हते. 

Arrow

गौरी खानने हेही सांगितले की, आर्यनच्या जन्मावेळी तो अगदी वेगळ्या विश्वात हरवून गेला होता.

Arrow

त्यानंतर शाहरुखने हे ही सांगितले की, त्याने स्वतः  ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन पाहिले होते, आणि त्यानंतर त्याला ते अजिबात भीतीदायक वाटलं नव्हते.

Arrow

शाहरुख खानने आर्यनच्या जन्मावेळची गोष्ट सांगताना तो म्हणतो की, त्याचा जन्म झाला आणि सगळं ऑपरेशन थिएटर आमचा आनंद साजरा करत होते.

Arrow

शाहरुखने हेही सांगितले की, डॉक्टरांनी मुलगा झाल्याचे सांगितल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला होता. पण त्याला पाहण्याआधी गौरी ठिक आहे की नाही हे मी आवर्जून विचारले होते. 

शेतकरी बापाच्या स्वप्नांसाठी हिमानी बनली IAS

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा